पुणे – रिलायन्स-जिओ, व्होडाफोन-आयडीया (व्हीआय) आणि एअरटेल यांनी प्री-पेड प्लॅनच्या किमती एकाच वेळी वाढवल्या आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही कंपन्यांनी सर्व प्री-पेड प्लॅनच्या किमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. मात्र काहीवेळा पॅकची विद्यमान डेटा मर्यादा संपल्यावर चित्रपट किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी एक छोटासा रिचार्ज देखील उपयुक्त ठरतो.
मोबाईल रिचार्ज दर वाढीनंतर अनेक योजना बंद पडल्या आहेत. मात्र छोट्या रिचार्ज पॅकची गरज असल्यास सर्वांना फायदा होतो. एअरटेल, व्होडाफोन -आयडीया आणि जिओ कडून अशा रिचार्ज प्लॅनची यादी तयार केली आहे, ज्यांची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे. या कंपन्यांच्या छोट्या रिचार्जमध्ये तुम्हाला अमर्याद टॉक टाईमसह डेटाचा फायदाही मिळेल. आपण सुरु करू….
एअरटेलच्या दोन सर्वोत्तम योजना
19चा पॅक
हा कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. हा पॅक दोन दिवसांच्या वैधतेसह देण्यात येतो, यामध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगसह 200MB डेटा मिळतो. पॅकमध्ये एसएमएस उपलब्ध होणार नाहीत.
99चा पॅक
हा स्मार्ट रिचार्ज श्रेणीचा पॅक आहे. हा पॅक 28 दिवसांच्या वैधतेसह येतो, यामध्ये ग्राहकांना 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 200MB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये एसएमएसचा फायदाही मिळत नाही.
व्होडाफोन -आयडीयाच्या 3 सर्वोत्तम योजना –
49चा पॅक
या पॅकची वैधता 10 दिवस आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 38 रुपयांचा टॉकटाइम आणि 100MB डेटा मिळतो. मात्र पॅकमध्ये SMS लाभ उपलब्ध नाही.
79चा पॅक
या पॅकची वैधता 21 दिवस आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 64 रुपयांचा टॉकटाइम आणि 200MB डेटा मिळतो. या पॅकमध्ये SMS लाभ उपलब्ध नाही.
99चा पॅक
या पॅकची वैधता 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 200MB डेटा मिळतो. या पॅकमध्ये SMS लाभ उपलब्ध नाही.
JioPhone च्या 100 रूपयांच्या अंतर्गत 2 सर्वोत्तम योजना
75 चा पॅक जीओचा हा प्लान 23 दिवसांची वैधता देतो. या प्लॅनमध्ये, ग्राहकांना 23 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग, 50 एसएमएस आणि एकूण 2.5 GB डेटा याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud सारख्या जीओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.
91चा पॅक:
जीओच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये, ग्राहकांना 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग, 50 एसएमएस आणि एकूण 3 GB डेटा मिळतो. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud सारख्या Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.