पुणे – आधुनिक काळात मोबाईल ही केवळ गरजेचीच नव्हे तर अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या मोबाईल वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी नेहमी नवनवीन मार्ग अवलंबतात. यापैकी एक मार्ग म्हणजे स्वस्त किंमतीत सर्वोत्तम लाभांसह योजना किंवा प्लॅन ऑफर करणे होय. ही गोष्ट लक्षात घेऊन एअरटेल कंपनीने मोबाईल वापरकर्त्यांसाठी 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीत चांगला लाभ देण्यासाठी एक नवीन योजना आणली आहे.
एका नव्या अहवालानुसार कंपनीने 50 रुपयांच्या अंतर्गत 5 नवीन प्लॅन लॉन्च केले आहेत. कंपनीचे हे नवीन प्लॅन 10, 19, 20, 48 आणि 49 रुपये आहेत. या योजनांमध्ये, कंपनी वापरकर्त्यांना डेटासह कॉलिंग फायदे देखील देत आहे. या प्लॅनचा तपशील जाणून घेऊ या…
49 आणि 48 रुपयांचे प्लॅन
एअरटेल कंपनीचा 48 रुपयांचा प्लॅन हा डेटा अॅड-ऑन पॅक आहे. यामध्ये कंपनी 3 जीबी डेटा देत आहे. या योजनेची वैधता सध्या चालू असलेल्या योजनेप्रमाणेच राहील. तसेच 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला 100 एमबी डेटासह 38.52 रुपयांचा टॉक टाइम देखील मिळेल. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.
10, 19 आणि 20 रुपयांचे प्लॅन
10 रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी अमर्यादित वैधतेसह 7.47 रुपयांचा टॉकटाइम देत आहे. त्याचबरोबर 19 रुपयांच्या प्लानमध्ये 200MB डेटा आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंग मिळेल. प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा संपल्यानंतर, कंपनी वापरकर्त्यांकडून प्रति एमबी डेटा 50 पैसे शुल्क आकारेल. 19 रुपयांच्या या प्लॅनची वैधता 2 दिवसांची आहे. कंपनीच्या 20 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित वैधतेचा लाभ मिळेल. या प्लॅनमध्ये कंपनी 14.95 रुपयांचा टॉकटाइम देत आहे.








