नागपूर – सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे खासगी असो की सरकारी टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत त्यातच एअरटेलने देखील या स्पर्धेमध्ये बाजी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
1) एअरटेलने अलीकडेच देशातील सर्व सर्कलसाठी 666 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. एअरटेलच्या या नवीन प्री-पेड प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळत आहे. याशिवाय सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. एअरटेलच्या 666 रुपयांच्या प्लॅनची वैधता कंपनीच्या 598 रुपयांच्या प्लॅनपेक्षा कमी आहे. त्यातच 598 रुपयांचा प्लान आता 719 रुपयांचा झाला आहे.
2) टेलिकॉम टॉकने सर्वप्रथम एअरटेलच्या या 666 रुपयांच्या प्लॅनची माहिती दिली आहे. एअरटेलच्या या 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटासह 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता 77 दिवसांची आहे.
3) 666 रुपयांच्या प्लॅनपेक्षा स्वस्त प्लॅन 549 रुपयांचा आहे, जो 56 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग ऑफर करतो. या प्लॅनमध्ये देखील अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचे मोबाईल व्हर्जन एका महिन्यासाठी मोफत उपलब्ध असेल. याशिवाय अपोलो 24 तास 7 दिवस सर्कलमध्ये प्रवेश तीन महिन्यांसाठी उपलब्ध असेल.
4) होडाफोन आयडीया (Vi) मध्ये 77 दिवसांच्या वैधतेसह 666 रुपयांचा प्री-पेड प्लॅन देखील आहे. या प्लॅनसह, Binge All Night म्हणजेच 12 PM ते 6 AM पर्यंत अमर्यादित इंटरनेट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट सारखे फायदे उपलब्ध आहेत.
5) जिओचा 666 रुपयांचा प्लॅन देखील आहे परंतु त्याची वैधता Airtel आणि Vodafone Idea पेक्षा जास्त आहे. जिओचा 666 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 1.5 GB डेटा ऑफर करतो.