पुणे – भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर भारती एअरटेल (Bharti Airtel ) मोबाईल वापरकर्त्यांना सर्वात स्वस्त SMS बंच प्रीपेड योजना ऑफर करत आहे. सध्या दरवाढीनंतर एसएमएस बंच प्रीपेड प्लॅन खूप महाग झाले आहेत. त्यातच, TRAI ने आदेश दिले की, ऑपरेटर 1900 वर मोफत पोर्ट आउट एसएमएसची परवानगी देऊ शकतील. मग प्लॅन एसएमएसच्या लाभांसह येत असेल किंवा नाही. तक्रारीनंतर काही दिवसांनी, जिओ सर्वात स्वस्त एसएमएस बंच प्रीपेड प्लॅन 199 रुपयांमध्ये ऑफर करणारा ऑपरेटर बनला. पण आता, एअरटेल आणखी स्वस्त प्लॅनसह SMS फायदे देत आहे.
एअरटेलचा 99 रुपयांची योजना ही एसएमएस फायदे ऑफर करत आहे. या प्रीपेड प्लॅन यूजर्सना मोठा होणार आहे. 99 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा आणि व्हॉइस कॉलिंग फायदे उपलब्ध नाहीत. मात्र मोबाईल वापरकर्त्यांना 99 रुपये टॉकटाइम, 200 एमबी डेटा, कॉलसाठी 1 पैसे प्रति सेकंद आणि स्थानिक एसएमएससाठी 1 रुपये, तर एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपये मिळतील. या प्लॅनची एकूण वैधता 28 दिवसांची आहे.
जिओचा प्लॅन एअरटेलच्या प्लॅनपेक्षा 20 रुपये जास्त महाग आहे, पण तो अमर्यादित लाभांसह एक प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 1.5GB डेटा प्रतिदिन, 300 SMS आणि 14 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळते. तसेच वापरकर्त्यांना JioCinema, JioTV, JioCloud आणि JioSecurity Suite चे सदस्यत्व मिळते. त्याच वेळी, भारती एअरटेलचा 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन वापरकर्त्यांना एसएमएसचा लाभ देणारा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यात एअरटेल थँक्स फायदे नसले तरीही वापरकर्त्यांना व्हॉइस कॉलिंग, डेटा आणि एसएमएस फायदे मिळतात.