पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. त्यातच एअरटेल आणि जिओ मध्ये ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे रिलायन्स जिओचा ताण वाढवण्यासाठी एअरटेलने आपला नवीन प्रीपेड प्लॅन बाजारात आणला आहे. कंपनीचा हा प्लॅन 999 रुपयांचा आहे. या प्लॅनसह, कंपनी अशा वापरकर्त्यांना फायदा करेल ज्यांना भरपूर डेटा आणि चांगली वैधता हवी आहे. आपण प्लॅन शोधत असाल तर एअरटेलचा हा नवीन रिचार्ज खूप उपयुक्त ठरू शकतो. प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB डेटा आणि Amazon Prime Video चे मोफत सबस्क्रिप्शन सोबत अनेक अतिरिक्त फायदे देखील दिले जात आहेत. याचा तपशील जाणून घेऊ या…
999चा प्लॅन
दररोज जास्त डेटा वापरणाऱ्या युजर्ससाठी Airtel चा हा प्लॅन उत्तम आहे. या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 2.5 जीबी डेटा मिळेल. 84 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये, कंपनी देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 84 दिवसांसाठी Amazon प्राइम मेंबरशिप देखील मिळेल. याशिवाय कंपनीचा हा प्लान Xstream मोबाईल पॅकचे सबस्क्रिप्शन देखील देतो.
449चा प्लॅन
एअरटेल आपल्या वापरकर्त्यांना 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत SMS सह अमर्यादित कॉलिंग देखील मिळते. तसेच प्लॅनमध्ये, कंपनी Xstream मोबाईल पॅकसह Amazon Prime Video च्या मोबाईल एडिशनचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे. एअरटेलचा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो.
2999चा प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळेल. प्लॅनमध्ये कंपनी रोजच्या 2.5 GB नुसार एकूण 912.5 GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये, तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस देखील मिळतात. कंपनी या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Jio अॅप्ससह Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देते.