पुणे – रिलायन्स जिओ, बीएसएनएल, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (VI) या सर्व टेलिकॉम कंपन्यामध्ये सध्या बाजारात स्पर्धा सुरू असल्याने ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन रिचार्ज प्लॅन मिळवण्यासाठी मोबाईल वापरकर्ते वेगवेगळ्या ऑफर्स शोधत असून रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाचेही असे अनेक प्लॅन आहेत. त्यात डेटा आणि मोफत कॉलिंगची सुविधा अतिशय कमी खर्चात उपलब्ध आहे.
भारतात लाखो स्मार्टफोन वापरकर्ते कॉलिंग, एसएमएस आणि डेटाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परवडणारे प्रीपेड रिचार्ज प्लॅन निवडतात. त्यांच्यासाठी रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) 200 रुपयांखालील प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत.
जिओ
आपल्या मोबाईल वापरकर्त्या ग्राहकांना 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 149 आणि 199 रुपयांचे प्लॅन देत आहे. 149 रुपयांच्या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंगचा लाभ दररोज 1 जीबी डेटासह उपलब्ध आहे. दररोज 100 मोफत एसएमएससह प्लॅनची वैधता 24 दिवस आहे. कंपनी या योजनेच्या ग्राहकांना जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देण्यात येत आहे.
जिओच्या 199 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये यूजर्सना दररोज 1.5GB डेटा आणि दररोज 100 मेसेज तसेच 28 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग मिळते. यासह, वापरकर्त्यांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सेक्युरिटी यासह इतर अनेक Jio अॅप्सवर मोफत प्रवेश मिळतो.
एअरटेल
वापरकर्त्यांना 200 रुपयांच्या आत तीन उत्कृष्ट प्लान देत आहे. कंपनीच्या 149 रुपयांच्या प्लानमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह एकूण 2GB डेटा दिला जात आहे. अमर्यादित कॉलिंग फायद्यांसह हा प्लॅन अॅमेझॉन प्राइम व्हिडिओची 30 दिवसांची विनामूल्य चाचणी तसेच विंक म्युझिक आणि एअरटेल एक्सस्ट्रीममध्ये विनामूल्य प्रवेश प्रदान करते. या प्लॅनमध्ये 300 मोफत एसएमएसचा लाभ उपलब्ध आहे.
एअरटेलचा दुसरा प्लॅन जो 200 रुपयांपेक्षा कमी आहे तो 179 रुपये आहे. यामध्ये अमर्यादित कॉलिंग, 300 मोफत एसएमएस आणि 2 जीबी डेटा देण्यात येत आहे. प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या योजनेत, कंपनी ही ग्राहकांना 2 लाख रुपयांचा भारती एक्सा लाइफ इन्शुरन्स देखील देत आहे. एअरटेल एक्सट्रीम आणि विंक म्युझिकसह प्राइम व्हिडिओ मोबाईल आवृत्तीची 30 दिवसांची विनामूल्य चाचणी योजनेत समाविष्ट केलेले इतर फायदे आहेत.
वोडाफोन-आयडिया
148 आणि 149 रुपयांचे प्लान 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे आहेत. 148 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 1GB डेटा आणि 100 मोफत SMS उपलब्ध आहेत. प्लानची वैधता 18 दिवस आहे. 149GB प्लान 3GB डेटासह 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर 300 SMS आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. कंपनीच्या अॅप किंवा वेबसाइटवरून प्लॅन रिचार्ज केल्यास 1GB अतिरिक्त डेटाचा लाभ मिळतो.