मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारती एअरटेल ही दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आहे. कंपनीने आघाडीची बँकिंग संस्था अॅक्सिस बँकेशी हातमिळवणी केली आहे. त्यांनी भारतीय बाजारपेठेसाठी को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. नवीन कार्डचे नाव Airtel Axis Bank Credit Card असे ठेवण्यात आले आहे. एअरटेलच्या ३४० दशलक्ष ग्राहकांसाठी विशेष लाभांसह उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या कार्डद्वारे, वापरकर्त्यांना आता खरेदी करा नंतर पैसे द्या, झटपट कर्ज उपलब्धता आणि बिल पेमेंटवर कॅशबॅक यांसारख्या अनेक सवलती देण्यात आल्या आहेत.
सर्व पात्र ग्राहक Airtel Axis Bank क्रेडिट कार्डसाठी Airtel Thanks अॅपद्वारे अर्ज करू शकतात. अॅक्सिस बँक भारती एअरटेलच्या एअरटेल आयक्यूसारख्या डिजिटल सेवांचा लाभ घेता येईल. यात व्हिडिओ, स्ट्रीमिंग, व्हॉइस, व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट सेंटर सोल्यूशन्स आणि कॉल मास्किंगसारख्या सेवांचा समावेश आहे. एअरटेल आणि अॅक्सिस बँक या दोघांसाठी ही एक फलदायी भागीदारी ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या उपक्रमामुळे कंपन्यांना त्यांचा ग्राहकवर्ग वाढवता येणार आहे.
Airtel Axis Bank क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेल्या फायदे असे..
कोणत्याही एअरटेल डीटीएच, मोबाइल रिचार्ज, एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर आणि एअरटेल ब्लॅक पेमेंटवर २५ टक्केपर्यंत कॅशबॅक.
झोमॅटो, स्वीगी आणि बिग बास्केटवर १० टक्के कॅशबॅक.
एअरटेल थँक्स अॅपद्वारे वीज, पाणी बिल आणि गॅस पेमेंटवर १० टक्के कॅशबॅक.
इतर सर्व खर्चांवर १ टक्के कॅशबॅक
कार्ड सक्रिय झाल्यावर रु. ५०० किमतीचे Amazon ई-व्हाउचर मिळणार आहे.