मुंबई – एअरटेलने आपला सर्वात स्वस्त ४९ रुपयांचा प्री-पेड प्लॅन बंद केला आहे. त्यामुळे आता एअरटेलचा ७९ रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन राहिला आहे. एअरटेलने हा प्लॅन बंद केल्याचा फायदा रिलायन्स जिओला होणार आहे. एअरटेलचे टूजीचे ग्राहक या प्लॅनचा वापर करत आहेत. सध्या एअरटेलच्या २ जी ग्राहकांची संख्या १३ कोटी आहे. ४९ रुपयांचा प्लॅन बंद केल्यामुळे हे ग्राहक जिओकडे स्थलांतरित होऊ शकतात.
जिओचा ७५ रुपयांचा प्लॅन चांगला
एअरटेलच्या ७९ रुपयांच्या प्री-पेड प्लॅनच्या तुलनेत जिओचा ७५ रुपयांचा प्लॅन चांगला आहे. जिओच्या ७५ रुपयांच्या प्लॅनमध्ये एअरटेलच्या तुलनेत ३० पटीने अधिक डाटा दिला जातो. एअरटेलच्या १०६ मिनिटांच्या तुलनेत जिओचा अमार्यादित कॉलिंगची सुविधा देत आहे. तसेच जिओ १०० मोफत एसएमआय आणि कोरोना संकट काळात ३०० मोफत मिनिट ऑफर केले जात आहे.
एअरटेलचा ७९ रुपयांचा प्लॅन
एअरटेल कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यातर्फे दुप्पट डाटा आणि चारपट कॉलिंग वेळ दिला जात आहे. एअरटेलच्या ७९ रुपयांच्या रिचार्जमध्ये २०० एमबी डाटा दिला जात आहे. जिओ ७५ रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा देत आहे. याच्या तुलनेत एअरटेलच्या ग्राहकांना १०६ मिनिटांच्या कॉलिंगसाठी ७९ रुपयांचा रिचार्ज करावा लागत आहे. जिओच्या ७५ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३ जीबी डाटा दिला जात आहे. एअरटेलच्या ७९ रुपयांच्या सुरुवातीच्या प्लॅनमध्ये फक्त २०० एमबी म्हणजेच ०.२ जीबी डाटा दिला जात आहे. रिलायन्स जिओच्या तुलनेत हा डाटा ३० पटीने कमी आहे.
जिओचा ७५ रुपयांचा प्लॅन
जिओचा ७५ रुपयांचा सुरुवातीचा प्रीपेड प्लॅन बाय वन गेट वन सोबत मिळतो. म्हणजेच ७५ रुपयांच्या एका रिचार्जवर दुसरा मोफत मिळतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जिओच्या ७५ रुपयांच्या रिचार्जमध्ये ५६ दिवसांत (२८+२८) च्या व्हॅलिडिटीसोबत अमर्यादित कॉलिंग, ६ जीबी डाटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. एअरटेल युजर्सना ७९ रुपयांमध्ये २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीमध्ये २०० एमबी डाटा आणि १०६ मिनिटे कॉलिंग मिनिटेच मिळणार आहेत.