विशेष प्रतिनिधी, मुंबई
एअरटेलने आजपासून एअरटेल ब्लॅक सेवा सुरू केली सिंगल रिचार्ज मध्ये आपल्याला होम टीव्ही, मोबाइल व ब्रॉडबँड चालविण्याची सुविधा उपलब्ध होते.एअरटेल ब्लॅक योजना विविध भागात विभागली आहे काय आहे यातील नेमकी सुविधा जाणून घेऊ या…
१) ९९८ रुपयांची एअरटेल ब्लॅक प्लॅन – या योजनेंतर्गत वापरकर्त्यांना दोन मोबाइल कनेक्शन व एक डीटीएच कनेक्शन मिळतात.
२) १३४९ रुपयांची एअरटेल ब्लॅक प्लॅन – या योजनेंतर्गत एअरटेल वापरकर्त्यांना तीन मोबाइल कनेक्शन आणि एक डीटीएच कनेक्शन मिळतात.
३) १५९८ रुपयांची एअरटेल ब्लॅक प्लॅन – या योजनेत दोन मोबाइल कनेक्शन आणि एक फायबर कनेक्शन उपलब्ध आहेत.
४) २०९९ रुपयांची एअरटेल ब्लॅक प्लॅन – या योजनेंतर्गत वापरकर्त्यांना तीन मोबाइल कनेक्शन, एक फायबर आणि डीटीएच कनेक्शन मिळतात.
एअरटेल मोबाईल वापरकर्ते दोन किंवा तीन सेवा निवडू शकतात आणि ३० दिवसांसाठी विनामूल्य सेवा देखील घेऊ शकतात. एअरटेल ब्लॅक प्लॅनसाठी एअरटेल थँक अॅप डाउनलोड करा किंवा अस्तित्त्वात असलेल्या सेवांचे पॅकेज करुन आपली योजना तयार करावी किंवा जवळच्या एअरटेल स्टोअरला भेट द्यावी.
तसेच 8826655555 या क्रमांकाला मिस कॉल द्या. एअरटेलचे अधिकारी आपणास एअरटेल ब्लॅक श्रेणीसुधारित करण्यासाठी संपर्क साधतील, अधिक माहितीसाठी एअरटेलच्या अधिकृत साइटला भेट द्या, https://www.airtel.in/airtel-black
टेलिकॉम ऑपरेटरने काही महिन्यांपूर्वी एअरटेल वन सेवा एकाच मोबाईल वापरकर्त्याच्या, एका बिलाच्या समान योजनेने सुरू केली.
या दूरसंचार कंपनीने सर्व एअरटेल मोबाईल वापरकर्त्यांना स्वयंचलितपणे एअरटेल ब्लॅक सेवेमध्ये श्रेणी सुधारित करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे म्हणणे आहे की, एअरटेल वन ही योजना एअरटेल ब्लॅकपेक्षा वेगळी आहे.