नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पर्यटन विकास आणि वाढीमध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात, भारतातील आकर्षक पर्यटन स्थळांबाबत पर्यटकांचे अभिप्राय जाणून घेण्यासाठी पर्यटन मंत्रालय देशभरातील विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर एक यंत्रणा सुरू करत आहे.
पर्यटकांना विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर संबंधित ठिकाणी असलेला क्यूआर कोड स्कॅन करून, केवळ 30 सेकंदात त्यांचा अभिप्राय आणि अनुभव रेटिंग नोंदवता येईल. या फीडबॅकमुळे मंत्रालय विविध हितधारकांच्या सहकार्याने सक्रियपणे समस्यांचे निराकरण करू शकेल.
पर्यटन मंत्रालयाने दिलेला क्युआर कोड वापरून, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय देशभरातील विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर या यंत्रणा उभारण्यासाठी पर्यटन मंत्रालयाशी सहकार्य करत आहे, जेणेकरून कालांतराने, ते पर्यटन धोरण आणि योजना दृष्टिकोन आणि माहितीचा एक विश्वासार्ह स्रोत ठरेल.