नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय दिलासादायक वृत्त आहे. कारण, विमानतळावरील चेक इन प्रक्रिया ही अनेकदा मनस्ताप देणारी आहे. आता मात्र प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) ने बीटावर आधारित डिजीयात्रा अॅप लाँच केले आहे. हे अॅप अँड्रॉइड युजर्स आणि विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आले आहे. DIAL नुसार, एकदा या अॅपची सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना त्यांचे ओळखपत्र आणि बोर्डिंग पास बाळगण्याची गरज भासणार नाही.
विशेष म्हणजे या अॅपच्या मदतीने प्रवाशांना पेपरलेस आणि अखंडपणे विमानतळावर प्रवेश घेता येणार आहे. DIAL नुसार, विमानतळावर प्रवाशांचा प्रवेश पेपरलेस आणि अखंडपणे करणे हे उद्दिष्ट आहे. ज्यामुळे वेळेची बचत होईल. म्हणजेच आता अॅपच्या मदतीने प्रवाशांना फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाद्वारे विमानतळावर प्रवेश दिला अॅप प्रवाशांना चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञानाद्वारे ओळखते. जे त्यांच्या बोर्डिंग पासशी जोडलेले आहे.
दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडकडून एका निवेदनाद्वारे जाहीर करण्यात आले आहे की, मोबाईलमधील ॲपच्या मदतीने, चेहऱ्याच्या ओळखीच्या आधारावर सर्व चेकपॉईंटवर प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे. एअरपोर्ट एन्ट्री, सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंग गेट या तिन्ही ठिकाणी या ॲपवरूनच प्रवेश दिला जाणार आहे. दिल्ली विमानतळावर, टी 3 टर्मिनलवर देशांतर्गत प्रवाशांसाठी हे सुरू करण्यात आले आहे.
दिल्ली विमानतळ आणि बंगळुरू विमानतळाच्या देशांतर्गत प्रवाशांच्या चेहऱ्याच्या ओळखीसाठी हे ॲप सुरू करण्यात आले आहे. या ॲपमुळे प्रवाशांची विमानतळावर होणाऱ्या सर्व त्रासांपासून सुटका होणार आहे. सध्या या ॲपचे बीटा व्हर्जन लाँच करण्यात आले आहे आणि लवकरच ते फुल स्केलवर ऑफर केले जाण्याची शक्यता आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या ॲपच्या साहाय्याने चेहऱ्याच्या आधारावर प्रवाशांची प्रवेश सर्व चेकपॉईंटवर केले जाणार आहेत. एअरपोर्ट एन्ट्री, सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंग गेट या तिन्ही ठिकाणी या ॲपवरूनच प्रवेश दिले जाणार आहेत. दिल्ली विमानतळावर, T3 टर्मिनलवर देशांतर्गत प्रवाशांसाठी बे ॲप सुरू करण्यात आले आहे.
एअर एशिया इंडिया, एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट आणि विस्तारा या टर्मिनलवरून हे ॲप चालणार आहे. बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (BIAL) कडून त्यांच्या एका वेगळ्या निवेदनामध्ये Digiyatra बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टमच्या बीटाची विस्तारा आणि एअर एशिया फ्लाइट्सवर चाचणी घेण्यात आली आहे. तर त्यांनी सांगितले की, Digiyatra App ची बीटा आवृत्ती Android OS साठी Play Store वर उपलब्ध आहे.
ॲपलच्या iOS प्लॅटफॉर्मवरही हे ॲप पुढील काही आठवड्यांत उपलब्ध होणार आहे. DIAL कडून जाहीरपणे सांगण्यात आले आहे की, हा एक बायोमेट्रिकचा अखंड प्रवासाचा आहे जो चेहरा ओळखणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि कागदपत्रांशिवाय विमानतळावर प्रवेश मिळवून देणे हा या पाठीमागचा उद्देश्य आहे. त्याच वेळी, BIAL ने सांगितले की, या अॅपच्या मदतीने, प्रवाशांना यापुढे विमानाने प्रवास करण्यासाठी जवळ कागदपत्रे बाळगण्याची गरज नाही. आता प्रत्येक चेक पॉइंटवर बायोमेट्रिक तंत्रज्ञानाद्वारे त्यांची ओळख पटवली जाणार असून ही सगळी प्रक्रिया देखील अतिशय सुरक्षित आहे.
सध्या, Digiyatra App वापरणे पूर्णपणे प्रवाशांच्या इच्छेवर अवलंबून आहे. ज्या प्रवाशांना ते वापरायचे आहे ते ते डाउनलोड करू शकतात. नोंदणीसाठी प्रवाशांना आधार तपशील द्यावा लागणार आहे. याशिवाय, त्यांना कोविड-19 लसीकरणाबाबत माहितीसह सेल्फी अपलोड करणे गरजेचे असणार आहे. या चाचणी दरम्यान आतापर्यंत सुमारे २० हजार प्रवाशांनी या अॅपद्वारे पेपरलेस आणि सीमलेस एंट्री केली आहे. या अॅपच्या मदतीने प्रवाशांना बायोमेट्रिक आणि इतर तपशील एकदाच सादर करावे लागतील. मग या तपशीलाच्या मदतीने तो त्याच्या आगामी सहली करू शकतो. याचा अर्थ प्रवाशांना प्रत्येक वेळी बायोमेट्रिक तपशील सादर करावा लागणार नाही.
DIAL नुसार, DigiYatra अॅपची बीटा आवृत्ती Google Play Store वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाली आहे. अॅपची iOS आवृत्तीही आठवडाभरात उपलब्ध करून दिली जाईल. Digi Yatra अॅपवर, तुम्हाला फोन नंबर आणि आधार तपशीलांच्या मदतीने नोंदणी करावी लागेल. यानंतर फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यातून सेल्फी घ्यावी लागेल आणि सबमिट करावी लागेल. शेवटी, लसीकरण तपशील आणि बोर्डिंग पास स्कॅन करून अॅपमध्ये जोडावे लागतील.
बंगळुरू आणि दिल्लीच्या विमानतळांवर डिजीयात्रा बोर्डिंग सिस्टम आणि ई-गेट सुरू करण्यात आले आहेत. मात्र देशातील सर्व देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. याचा अर्थ प्रवासी त्यांची ओळख आणि बोर्डिंग पास प्रमाणित करण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी करू शकतात. यानंतर, चेक-इन आणि सुरक्षा तपासणीनंतर ते त्यांच्या फ्लाइटमध्ये चढतील.
Airport Check In Passenger New System Recognition