मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जर तुम्ही विमान प्रवास करीत असाल किंवा करणार असाल तर तुमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, विमान प्रवास करताना सोबत आपण काही सामानही घेऊन जात असतो. कधी एक बॅग तर कधी दोन किंवा तीन बॅगाही आपण बाळगतो. मात्र, यापुढे असे चालणार नाही. विमान प्रवाशाला केवळ एकच हँडबॅग आता वापरता येणार आहे. त्यालाच परवानगी असणार आहे. एकापेक्षा अधिक हँडबॅगेला परवानगी नसेल. त्यामुळे तुमच्यासोबत आणखी एक हँडबॅग असेल तर ती तुम्हाला लगेजमध्ये द्यावी लागेल.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकांनी एक पत्र सर्व विमान कंपन्या आणि सर्व विमानतळ प्रवाशांना पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, विमान प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला केवळ एकच हँडबॅगला परवानगी असेल. या नियमाचे सर्वांना कठोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित विमान सेवा कंपनीला जबाबदार धरले जाणार आहे. महिलांकडे जर पर्स असेल त्यांना अन्य हँडबॅगला परवानगी नसेल. प्रवाशांना विमानतळावर घालवावा लागणारा कालावधी आणि चेक इन करण्यात जाणारा वेळ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. महासंचालकांचे पत्र असे