विशेष प्रतिनिधी, पुणे
भारतीय हवाई दलाकडून कॉमन अॅडमिशन टेस्ट साठी अर्ज प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली आहे. एकूण ३३४ रिक्त जागांसाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. एएफसीएटी फ्लाइंग ब्रांच आणि ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल अँड नॉन-टेक्निकल) शाखेत कमिशनर ऑफिसर म्हणून ही भरती केली जाते. या भरती संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध होऊन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
भारतीय वायुसेनेतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या हवाई दलाच्या कॉमन अॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी) ची तयारी करणार्या उमेदवारांना ही संधी आहे. इंडियन एअर फोर्स (आयएएफ) ने फ्लाइंग ब्रांच आणि ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल अँड नॉन-टेक्निकल) शाखेत कमिश्नर ऑफिसर म्हणून भरतीसाठी वर्षाकाठी दोनदा एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट (एएफसीएट बॅच ) आयोजित केली. एएएफएटी बॅच, आयएएफच्या अधिसूचनेनुसार, हवाई दलाची संयुक्त प्रवेश परीक्षा ही जुलै २०२२ पासून सुरू होणार्या एकूण ३३४ रिक्त पदांसाठी घेतली जाईल.










