इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्याकडे आकर्षक आणि दणकट बाईक असावी, असे बहुतांश तरुणांना वाटते. त्यातच लाँग टूरसाठी अलीकडच्या काळात बाईकला देखील प्राधान्य देण्यात येते. सहली, पर्यटन स्थळे, किल्ले आणि गिर्यारोहण आदी ठिकाणी जाण्यासाठी प्राधान्यक्रमाने बाईकचा वापर करण्यात येतो. त्याचप्रमाणे या बाईकवर सामान ठेवण्यासाठी देखील सुविधा असल्यास त्याला अधिक पसंती देण्यात येते. सध्या अशा प्रकारच्या बाईकची क्रेझ वाढली आहे. होंडा कंपनीने एअरबॅग असलेली मोटारसायकल भारतात लॉन्च केली आहे. त्यामुळे तिची सध्या फारच चर्चा आहे. आता त्याच मोटारसायकल विषयी आपण जाणून घेऊ..
Honda Motorcycle and Scooter India ने भारतीय बाजारपेठेत 2022 गोल्ड विंग टूर लॉन्च केली आहे. कंपनीने ते CBU मॉडेल म्हणून सादर केले आहे. नवीन गोल्ड विंग टूरची किंमत 39.20 लाख रुपये (एक्स-शोरूम, गुडगाव हरियाणा) आहे. Honda ने 2022 गोल्ड विंग टूर DCT साठी एअरबॅग पर्यायासह बुकींग घेणे देखील सुरु केले आहे.
2022 गोल्ड विंग टूर मोटरसायकलमध्ये क्रूझ कंट्रोल सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय, 7-इंचाचा संपूर्ण-रंगाचा TFT लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले आहे, जो ऑडिओ आणि नेव्हिगेशन सिस्टम, राइडिंग मोड्स व्यवस्थापित करणे किंवा सस्पेंशन सेटिंग्ज समायोजित करणे यासह सर्व माहिती देतो. या मोटरसायकल मध्ये 21-लिटर क्षमतेची इंधन टाकी, Apple CarPlay आणि Android Auto, Bluetooth कनेक्टिव्हिटी, दोन USB Type-C पोर्ट यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.
नवीन गोल्ड विंग 1833cc लिक्विड-कूल्ड, 4-स्ट्रोक 24-वाल्व्ह SOHC फ्लॅट-6 इंजिनद्वारे समर्थित आहे जे 5,500rpm वर 93kW (124bhp) आणि 4,500rpm वर 170Nm पीक टॉर्क निर्माण करते. यात 4 राइड मोड टूर, स्पोर्ट, इकॉन आणि रेन आहेत. बाइकला होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HSTC) मिळते जे मागील चाकाचे ट्रॅक्शन राखते.