नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विमान प्रवासाद्वारे परदेशात जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. तुमचेही ते असेल तर एक नामी संधी चालून आली आहे. ती म्हणजे, तुम्हाला हा प्रवास फुकट करायला मिळाला तर. हो हे शक्य आहे. आशिया खंडातील मोठी विमान कंपनी असलेल्या एअर एशियाने एक भन्नाट ऑफर आणली आहे. ही कंपनी चक्क ५० लाख तिकिटे फुकट वाटणार आहे.
कोरोना काळात जगभरातील अनेक देशातील विमानसेवा ठप्प झाली होती, यामध्ये एअर एशियाला देखील फटका बसला होता, परंतु आता कंपनीची स्थिती पुन्हा पूर्वपदावर आली आहे, इतकेच नव्हे तर कंपनीला चांगला नफा देखील मिळत आहे त्यामुळे या कंपनीने भारतात तसेच जगभरात मोफत फिरण्याची ऑफर जारी केली आहे. त्यामुळे विमानाने पहिला प्रवास करायचा असेल, देशातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी विमानातून जायचे असेल तर हवाई प्रवासाचे नियोजन करण्यासाठी हीच योग्य वेळ ठरेल.
चार महिन्यापूर्वी केंद्र सरकारने विमान तिकिट दरावरील मर्यादा हटवल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपले तिकिट स्वस्त केले आहे. प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये चुरस लागली आहे. त्यात अनेक कंपन्यांनी तिकिट स्वस्ताईची योजना अवलंबत आहे. याचा प्रवाशांना सध्यातरी चांगलाच फायदा होणार आहे. तसेच विमान कंपन्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. यात इंडिगो, स्पाईसजेट, एयर इंडिया, विस्तारा आणि नवीन कंपनी अकासा यांचा समावेश असेल.
गेल्या काही काळापासून विमान प्रवाशांची संख्याही वाढली आहे. कोरोनाच्या पूर्वी असलेली प्रवासी संख्या सध्या विमान प्रवास करताना दिसते आहे. त्यामुळे विमान कंपन्यांच्या महसुलातही वाढ झालेली आहे. तीन महिन्यापूर्वी एअर एशिया विमान कंपनीने आपल्या प्रवाशांसाठी एक सेल आणला होता. या फेस्टिव्ह सेलच्या माध्यमातून कंपनी अवघ्या ९९९ रुपयांमध्ये विमान प्रवास करण्याची संधी दिली होती.
सध्या एअर एशिया कंपनीची १६५ ठिकांणी विमान सेवा आहे. यामध्ये डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय शहरांचा समावेश आहे. दरम्यान, प्रवाशांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने विमान कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर करत आहेत. प्रवाशांची संख्या आणि विमान कंपन्यांकडून सतत येत असलेल्या विशेष ऑफर्स. यामुळे विमानप्रवास स्वस्त होत असल्याचे दिसून येत आहे.
अनेक इच्छुक प्रवासी कंपनीच्या अॅपला भेट देऊन एअर एशियाच्या ५० लाख विनामूल्य सीटच्या या आकर्षक ऑफरचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, प्रवासी कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन ‘फ्लाइट्स’ आयकॉनवर क्लिक करून आपल्या पसंतीच्या शहरासाठी सीट बुक करू शकतात. प्रवाशांना हे लक्षात ठेवावे लागेल की, हे मोफत तिकीट इतर कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करू शकत नाहीत आणि त्याच वेळी ते सर्व परिस्थितीत निर्धारित कालावधीत वापरावे लागेल.
स्वस्तात विमान तिकिटे जारी करणारी एअरलाईन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या एअरलाईनच्या ऑफरचा फायदा कोणीही घेऊ शकणार आहे. मात्र, ही लिमिटेड वेळासाठी ऑफर असून १९ सप्टेंबरपासून तिकीटांच्या बुकिंगला सुरुवातही झाली आहे. हा सेल २५ सप्टेंबरपर्यंतच सुरु असणार आहे. या काळात फक्त तिकिटे बुक करायची आहेत. याची माहिती एअरलाईनने आपल्या ट्विटर हँडलवर दिली आहे.
एअर एशियाच्या विमानाची तिकीटे बुक केल्यावर दि. १ जानेवारी २०२३ ते २८ ऑक्टोबर २०२३ या काळात मोफत हवाई प्रवास करू शकणार आहात. ही ऑफर अधिकतर आशियाई देशांसाठी आहे. या ऑफर अंतर्गत लँगकावी, पेनांग, जोहोर बाहरू, क्राबी, फु क्वोक आणि सिंगापूरसह आसियानमधील अनेक लोकप्रिय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्थानांवर विनामूल्य जागा उपलब्ध आहेत.
Air Asia Free Ticket ही त्यांची वेबसाईट किंवा त्यांच्या सुपर अॅपद्वारे बुक करू शकता. तसेच या ऑफरबाबतची अधिक माहिती तुम्ही फ्लाईट्स आयकॉनवर जाऊन पाहू शकता. याचबरोबर कंपनीने जास्त पसंतीच्या रोमँटीक डेस्टिनेशनसाठी देखील विमान सेवा सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रकोपानंतर आता एअरलाईन कंपन्यांनी वेग पकडला आहे. अनेक कंपन्या कोरोनापूर्वीचा व्यवसाय पातळी गाठण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी ऑफर्सची लयलूटही केली जात आहे, असे असताना स्वस्त हवाई सेवा पुरविणाऱ्या या कंपनीने या कंपन्यांना आणखीनच आव्हानात्मक स्थितीत टाकले आहे. या ऑफरमुळे एअर एशियाला नवीन ग्राहक देखील मिळणार आहेत. तसेच अगदी किफायती दरात नव्हे तर मोफत विमान प्रवास भारतीयांना करता येणार आहे.
https://twitter.com/airasia/status/1571693677944373248?s=20&t=WbtiylCy35qh7Gzb4YqDYg
AirAsia 50 Lakh Free Tickets Bumper Offer
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/