नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही निर्बंधाशिवाय आता विमान कंपन्या तिकिटांचे दर ठरवू शकणार आहेत. केंद्र सरकार कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या हवाई प्रवासाच्या दरांविषयीची मर्यादा पूर्णपणे हटविणार आहे. हवाई तिकिटावरील कमाल आणि किमान पातळीवरील मर्यादा हटविण्यात येणार आहे. दि. 31 ऑगस्टपासून हा निर्णय लागू होईल. त्यामुळे विमान प्रवास आणि भाड्यामध्ये मोठा बदल होणार आहे.
जर एखाद्या व्यक्तीला मुंबईहून अहमदाबादला जायचे असेल तर अकासा विमान कंपनीचे तिकिट 4200 च्या आसपास असेल. तिकिटाचे हे साधारणपणे पुढील 15 दिवसांत कुठल्याही दिवशीचे तिकिट बुक केले तरी सारखेच असतील. मात्र तुम्ही 25 ऑगस्टचे तिकिट बुक केले तर हे तिकिट तुम्हाला 2100 रुपयांपर्यंत मिळू शकेल. याचा अर्थ असा की यापूर्वी विमान कंपन्या ग्राहकांना स्वस्तात तिकिटे देऊ इच्छित होत्या, मात्र सरकारने घातलेल्या मर्यादेमुळे त्यांना ते शक्य होत नव्हते. त्यासाठी त्यांना 15 दिवसांच्या कालावधीची मर्यादा अडचणीची ठरत होती.
विमान प्रवासदरावरील मर्यादा हटवल्यानंतर विमान कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यात इंडिगो, स्पाईसजेट, एयर इंडिया, विस्तारा आणि नवीन कंपनी अकासा यांचा समावेश असेल. गेल्या काही काळापासून विमान प्रवाशांची संख्याही वाढली आहे. कोरोनाच्या पूर्वी असलेली प्रवासी संख्या सध्या विमान प्रवास करताना दिसते आहे. त्यामुळे विमान कंपन्यांच्या महसुलातही वाढ झालेली आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय सकारात्मक ठरेल अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. प्रवाशांची संख्या आणखी वाढल्यास प्रवाशांच्या तिकिट दरात कपात होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले की, एयर टर्बाईन इंधनाच्या दैनंदिन मागण्यांच्या आणि किमतींची सावधानतेनी तपासणी केल्यानंतरच हा प्रवासी तिकिट दरावरील मर्यादा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर, देशांतर्गत विमान प्रवासदरावरील किमतीची मर्यादा हटवण्याची मागणी विमान कंपन्या करीत होत्या. या मर्यादेमुळे विमान प्रवाशांच्या संख्येवर नियंत्रण येत असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
तसेच प्रत्येक सामान्य माणसाला एकदा तरी विमानाने प्रवास करण्याची इच्छा असते. परंतु अनेकवेळा विमानाचे तिकीट परवडत नाही किंवा येत्या काही महिन्यात विमान प्रवास करणार असाल तर आताच तुमची तिकीटे बुक करा. एअर एशिया इंडियासह अनेक विमान कंपनी विमान प्रवाशांसाठी स्वस्त स्वस्त करण्याची अपेक्षा आहे. याबाबत केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
भारतातून व्यवसाय , शिक्षणासह पर्यटानासाठी परदेशात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच परदेशी प्रवास करण्यासाठी हवाई मार्ग हा सर्वाधिक निवडल्या जाणाऱ्या पर्यायांपैकी एक आहे. कारण अगदी कमी वेळात जगाच्या एका कोपऱ्यातू दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचायचे असल्यास हवाई मार्ग हा सर्वोत्तम पर्याय आहे. तरी भारतीयांचा हाच आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास स्वस्त होणार असल्याची शक्यता आहे.
तसेच अगदी किफायती दरात आता भारतीयांना विमान प्रवास करता येणार आहे. केंद्र सरकारकडून आंतराराष्ट्रीय प्रवासासंबंधी एक करार करण्यात आला आहे. त्या कराराची पार्श्वभूमी बघता भारतीयांचा आंतराष्ट्रीय प्रवास स्वस्त होण्याचे चिन्ह दिसत आहेत. त्याकरिता
जगातील 116 देशांसोबत भारत सरकारने प्रवासासंबंधी द्विपक्षीय करार केला आहे. या करारानुसार परदेशी विमान कंपन्यांना भारतातील महानगरांसोबत जोडण्यासाठी भारत सरकारने परवानगी दिली आहे.
विशेष म्हणजे ज्या विविध देशांसोबत भारताने करार केला आहे त्यांचा हवाई प्रवास स्वस्त होण्याचे चिन्ह आहेत. यामध्ये आशिया, युरोप, मध्य पूर्व आणि दक्षिण अमेरिकेतील देशांचा समावेश आहे. तरी सर्वसामान्य भारतीयांना परवडेल अशा दरात आता भारतीयांना 116 देशात प्रवास करता येणार आहे. तसेच परदेशी विमान प्रवासातील आसन क्षमता वाढवण्यासाठी देखील केंद्र सरकाने हा करार केलेला आहे.
Air Service Fair Travel Big Changes 31 August Government