नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विमान प्रवासादरम्यान कोणत्याही समस्येमुळे त्रस्त झालेले प्रवासी प्रशासनिक सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाने (डीएआरपीजी) सुरु केलेल्या ऑनलाईन पोर्टलच्या म्हणजेच केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि निरीक्षण यंत्रणेच्या (सीपीजीआरएमएस) माध्यमातून त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात.
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयातर्फे संचालित एअरसेवा नामक पोर्टलच्या माध्यमातून देखील त्यांच्या तक्रारी दाखल करू शकतात. पुढील कार्यवाहीसाठी या तक्रारी संबंधित विमान कंपनीकडे दाखल करण्यात येतात. हवाई कंपनीच्या तक्रार निवारण पद्धतीमुळे अर्जदार प्रवासी जर समाधानी नसेल तर त्याला/तिला अपील करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. तक्रारीच्या निवारणाची प्रक्रिया विविध पातळ्यांवर तपासली जाते. प्रत्येक विमान कंपनी तक्रार निवारणासाठी नोडल अधिकारी आणि अपील अधिकारी यांची नेमणूक करते आणि आपापल्या संकेतस्थळांवर या अधिकाऱ्यांचे संपर्क तपशील उपलब्ध करून देते.
नागरी हवाई वाहतूक शर्ती (सीएआरएस)मधील विभाग क्र.3 च्या हवाई वाहतूक मालिका एम मधील सार्वजनिक वाहतूक उपक्रमांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना विमानाच्या तिकिटाचा परतावा या नावाच्या दुसऱ्या भागात असे म्हटले आहे की एजंट अथवा पोर्टलच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या तिकिटाचे पैसे संबंधित प्रवाशाला परत करण्याची जबाबदारी त्या त्या विमान कंपनीची असते कारण हे एजंट म्हणजे त्या कंपन्यांचे नियुक्त प्रतिनिधी असतात. तिकिटाचे पैसे परत करण्याची प्रक्रिया कामकाजाच्या 30 दिवसांच्या कालावधीत पूर्ण केली जाईल याची सुनिश्चिती विमान कंपन्यांनी करणे अपेक्षित आहे. विमान कंपन्या देखील अशा प्रकारच्या तक्रारी सोडवण्यासाठी पुढाकार घेतात. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (डॉ.)व्ही.के.सिंग (निवृत्त) यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
प्रवाशांनी त्यांच्या तक्रारी खालील लिंकवर कराव्यात
https://airsewa.gov.in/home
Air Passenger Complaint Facility Union Government