नवी दिल्ली – सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला विकत घेण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे असणाऱ्या टाटा सन्स लिमिटेड आणि सरकारदरम्यान करार लवकरच पूर्ण होणार आहे.
या महिना अखेरच्या आधीच टाट सन्स आपली बोली नोंदवणार आहे. कर्जामध्ये बुडालेली ही कंपनी विकण्याची तयारी केंद्र सरकारकडून सुरू झाली आहे. २००७ मध्ये इंडियन एअरलाईन्समध्ये विलय झाल्यानंतर विमान कंपनीचा वार्षिक फायदा घसरत गेला.
आगामी वर्षांमध्ये एअर इंडियाचे अनेक कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे कंपनीचा मालकी हक्क कर्मचाऱ्यांसाठी एक संवेदनशील मुद्दा होणार आहे. मालकी हक्का कोणाकडेही गेला तरी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती संबंधित मुद्यांवर सरकारने लक्ष घालावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
टाटा ग्रुपकडूनच सुरुवात
एअर इंडिया कंपनीला टाटा ग्रुपनेच १९३२ मध्ये सुरू केले होते. त्यानंतर १९५३ मध्ये ती सरकारला विकली. आता पुन्हा टाटा ग्रुप एअर इंडियाला उभे करू इच्छित आहे. एअर इंडियाची गुंतवणूक या आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीपर्यंत होण्याची आशा सरकारने व्यक्त केली आहे.
कर्जात बुडालेली
सध्या एअर इंडियाच्या डोक्यावर ९०,००० कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात एअर इंडियाला १०,००० कोटींचे नुकसान होणार आहे. एअर इंडियासाठी टाट ग्रुप आपली बोली एअर एशिया इंडियाद्वारे लावणार आहे. एअर एशिया इंडियामध्ये टाटा ग्रुपकडे कंट्रोलिंग स्टेक आहेत. मध्य पूर्व भागातील सॉवरेन फंड कंपनीसोबत मिळून एअर इंडियाला विकत घेण्याची योजना अजय सिंह यांनी बनवली आहे.