इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासे दररोज होत आहेत. यावेळी पीडित महिलेने केलेला खुलासा एअर इंडियाच्या व्यवस्थापनावरही अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. त्यामुळे या प्रकाराची देशभर चर्चा होत आहे.
या घटनेची माहिती देताना महिलेने सांगितले की, त्या दिवशी जे घडले ते मी कधीही विसरू शकत नाही. आरोपीने माझ्यावर लघवी केली. त्यानंतर सुमारे तासाभरानंतर माफी मागण्यासाठी त्याला माझ्याकडे पाठवण्यात आले. तो माझ्यासमोर विनवणी करू लागला आणि म्हणाला की माझे एक कुटुंब आहे, कृपया मला सोडा. माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करू नका. या घटनेचा परिणाम पत्नी आणि मुलांवर होऊ नये असे त्याला वाटत होते. त्याने माझी अनेकदा माफी मागितली.
पीडितेने सांगितले की, आरोपी ज्या प्रकारे वागला त्यामुळे मी त्याला माफ करणार नाही, परंतु एअर इंडियाच्या क्रू मेंबरने मला आरोपीशी समेट करण्यास भाग पाडले. एफआयआर नुसार, पीडितेने आरोप केला आहे की, तिला तिच्या इच्छेविरुद्ध आरोपीला सामोरे जाण्यास आणि त्याच्याशी संवाद साधण्यास भाग पाडले गेले, ज्यामुळे ती आणखीनच नाराज झाली.
Air India Flight Women Passenger Tell Detail Story