शनिवार, नोव्हेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पायलट म्हणाला, ‘माझी ड्युटी संपली, मी निघालो’; मग, रनवे वरील विमानाचे आणि त्यातील प्रवाशांचे काय झाले?

जून 26, 2023 | 4:20 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो



नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही शासकीय किंवा खासगी कार्यालयातील किंवा कंपनीमधील एक प्रसिद्ध संवाद म्हणजे ‘माझी ड्युटी संपली मी चाललो… ‘ असे म्हणत अनेक जण काम अर्धवट टाकून निघून जातात. त्यामुळे सर्वांचेच मोठे नुकसान होते. परंतु एका पायलटने असे उद्गार काढल्यास विमान प्रवाशांचे काय हाल झाले असतील, हे सांगणे कठीण ठरते. परंतु प्रत्यक्षात असे घडले आहे.

५ तास विमान उभेच..
दिर्घ प्रतिक्षेनंतर रविवार, दि.२५ जून रोजी दिल्ली-मुंबईसह देशातल्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. मात्र पाऊस आणि खराब हवामानामुळे रविवारी अनेक विमानांची उड्डाणे उशिराने झाली तर काही ठिकाणी विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. दिल्ली विमानतळावरून विमानांची उड्डाणं करण्यात आणि आलेली विमाने उतरवण्यात खूप अडचणी येत होत्या. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांच्या लँडिंग आणि टेक ऑफमध्ये अडचणी येत होत्या. याचदरम्यान, लंडनहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे एक विमान (एआय-११२ ) खराब हवामानामुळे दिल्लीत उतरवता आले नाही. अशा परिस्थितीत हे विमान जयपूरच्या दिशेने वळवण्यात आले. या काळात परदेशातून दिल्लीला येणारी, तसेच अनेक देशांतर्गत विमाने जयपूरला डायव्हर्ट करण्यात आली. दोन तासांनी हवामान सुधारलं. त्यानंतर दिल्ली विमानतळ प्रशासनाने क्लिअरन्स दिला. लँडिंग क्लिअरन्स मिळाल्यानंतर जयपूरला उतरवण्यात आलेली विमाने एक एक करत दिल्लीच्या दिशेने रवाना करण्यात आली. परंतु लंडनहून दिल्लीला येणारे विमान तीन तास झाले तरी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले नाही. कारण पायलटने या विमानाचे उड्डाण करण्यास नकार दिला. माझी ड्युटी संपली आहे, असे म्हणत त्याने विमान उडवण्यास नकार दिला. एवढे बोलून हा पायलट विमानातून उतरला. पायलटच्या या निर्णयामुळे सकाळी ४ वाजता दिल्लीला पोहचणारे विमान ५ तास उलटले तरी जयपूर विमानतळावरच उभे होते. अखेर विमानात बसलेले अनेक प्रवासी वैतागले.

नियमांचे काटेकोर पालन
दिर्घ विमान उभे असल्यामुळे विमानातील ३५० प्रवाशांपैकी काही प्रवाशांना बसने दिल्लीला पाठवण्यात आले. त्यानंतर विमान दिल्लीला पोहोचवण्यासाठी दुसऱ्या क्रू मेंबर्सची व्यवस्था करण्यात आली. उरलेल्या प्रवशांना घेऊन काही तासांनी विमान जयपूरहून दिल्लीला आले. दरम्यान, एअर इंडियाने त्यांच्या अधिकृत निवेदनाद्वारे सांगितले की, खराब हवामानामुळे आणि खराब दृष्यमानतेमुळे हे विमान जयपूरला डायव्हर्ट करण्यात आले. हवामान सुधारण्यास खूप वेळ लागला. त्यादरम्यान कॉकपिट चालक दलाचा ड्युटी डाईम लिमिटेशन अवधी संपला होता. अर्थात पायलट किती वेळ विमान चालवू शकतो याची एक मर्यादा असते. हा पायलट लंडनहून विमान घेऊन आला होता. त्यानंतर काही तास तो जयपूरमध्ये वाट पाहत होता. नियामक प्राधिकरणांनी निर्धारित केलेल्या एफडीटीएलअंतर्गत आल्यानंतर पायलट विमान चालवू शकत नाहीत. एअर इंडिया कंपनी त्यांचे प्रवाशी आणि पायलटसह क्रू मेंबर्सच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देते. तसेच विमान संचालनाच्या सर्व नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करतो. त्यामुळेच त्या विमानाच्या उड्डाणासाठी तातडीने नव्या क्रूची व्यवस्था केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुलीच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे उघड झाला बालविवाह… तब्बल ३० जणांवर गुन्हा दाखल

Next Post

गडचिरोलीतील आत्मसमर्पित नक्षलवादी करणार चित्रपटात अभिनय.. उत्साहात दिली ऑडिशन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
FyQgxNsagAEvYtN e1687777200176

गडचिरोलीतील आत्मसमर्पित नक्षलवादी करणार चित्रपटात अभिनय.. उत्साहात दिली ऑडिशन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011