नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने असे लज्जास्पद कृत्य केले की, सगळे बघतच राहिले. बिझनेस क्लासमध्ये बसलेल्या ७० वर्षीय महिलेवर या प्रवाशाने थेट लघुशंका केली. महिलेच्या तक्रारीनंतरही केबिन क्रू मेंबर्सकडून त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. यानंतर महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहिले आहे, त्यानंतरच या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना २६ नोव्हेंबर २०२२ ची आहे. या महिलेने पत्रात लिहिले आहे की, विमानातील क्रू मेंबर्स कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सतर्क नव्हते. त्यांची सुरक्षा आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी विमान कंपन्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
नेमकं काय घडलं
महिलेने तिच्या पत्रात म्हटले आहे की, ती एअर इंडियाच्या फ्लाइट AI-102 ने न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळावरून दिल्लीला येत होती. दुपारच्या जेवणानंतर विमानाचे दिवे बंद करण्यात आले. दरम्यान, एक मद्यधुंद व्यक्ती त्यांच्या सीटजवळ आला आणि त्याने माझ्या अंगावर लघवी केली. त्यानंतरही ती व्यक्ती माझ्या जवळच उभी राहिली. सहप्रवाशाने सांगितल्यानंतर तो तेथून हटला.
जंतुनाशक फवारणी करून एअर होस्टेस निघून गेली
महिलेने सांगितले की, घटनेनंतर तिचे कपडे, बॅग, शूज लघवीने पूर्णपणे भिजले होते. त्यांनी क्रू मेंबर्सना याची माहिती दिली, त्यानंतर एअर होस्टेस आली आणि जंतुनाशक फवारणी करून निघून गेली. थोड्या वेळाने तिला पायजमा आणि डिस्पोजेबल चप्पल देण्यात आली. महिलेने सांगितले, लघवी करणाऱ्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर ती व्यक्ती निघून गेली.
एअर इंडियाने एफआयआर दाखल केला
टाटा समूहाच्या अध्यक्षांना पत्र लिहिल्यानंतर एअर इंडिया कारवाईच्या मूडमध्ये आहे. २६ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेसंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय या घटनेच्या चौकशीसाठी एअर इंडियाने अंतर्गत समितीही स्थापन केली असून पुरुष प्रवाशाला ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे.
ही होऊ शकते कारवाई
या चौकशीत संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यावर त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. त्याला आजीवन विमान प्रवासावर बंदी घातली जाऊ शकते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
Air India Flight Drunk Passenger Urinated on Women
Air Service DGCA New York New Delhi