नवी दिल्ली – सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाची मालकी अखेर निश्चित झाली आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री गटाची आज बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. अपेक्षेनुसार एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे गेली आहे. सर्वात मोठा दावेदार म्हणून टाटा समूहाकडेच पाहिले जात होते. टाटा सन्सने एअर इंडिया खरेदी करण्यास स्वारस्य दाखवले. या वर्षाच्या अखेरीस जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी विमान कंपनी टाटा समूहाकडे येणार आहे. टाटा समूहाकडे सध्या एअर एशिया आणि विस्तारा एअरलाईनमध्ये समभाग आहेत.
विस्तारा एअरलाईन
विस्तारा एअरलाइन टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेड यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. यामध्ये टाटा सन्सचा ५१ टक्के हिस्सा आहे, तर सिंगापूर एअरलाइन्सचा ४९ टक्के हिस्सा आहे. मात्र ही कंपनी टाटा एसआयए एअरलाइन्स लिमिटेड म्हणून नोंदणीकृत आहे. विस्ताराकडे ४७ विमाने असून ती दररोज २०० हून अधिक उड्डाणे उडवते.
एअर एशिया
मलेशियन एअरलाइन्स कंपनी एअर एशिया बेरहाद आणि टाटा सन्स यांच्या संयुक्त उपक्रमातून एअर एशियाची २०१३ मध्ये सुरुवात झाली. या कंपनीमध्ये टाटा सन्सची ५१ टक्के हिस्सेदारी होती, तर एअर एशिया बेरहादची ४९ टक्के हिस्सेदारी होती. तथापि, गेल्या वर्षी एअर एशिया बेरहादने आपला ३२.६७ टक्के हिस्सा टाटा सन्सला २७६ कोटी रुपयांना विकली. आता कंपनीतील टाटा सन्सचा हिस्सा ८३.६७ टक्के पर्यंत वाढला आहे.
७० वर्षांनंतर पुन्हा एकदा मालकी
एअर इंडिया अजूनही सरकारच्या ताब्यात आहे, परंतु सुमारे ७० वर्षांपूर्वी ही विमानसेवा जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये सुरू केली. तेव्हा टाटा हवाई सेवा असे नाव होते. त्यानंतर ती टाटा एअरलाइन्स झाली. २९ जुलै १९४६ रोजी ती पब्लिक लिमिटेड कंपनी बनली. तथापि, पुढे १९५३ मध्ये सरकारने टाटा एअरलाईन्स ताब्यात घेतली. आता पुन्हा एकदा टाटा समूहाची उपकंपनी टाटा सन्सने एअर इंडियाची मालकी मिळविली आहे.ॉ
https://twitter.com/PIB_India/status/1446437818209767424