इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागरी विमान वाहतूक महासंचालनायाने (DGCA) ने अहमदाबाद विमान अपघातामध्ये सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अधिका-याविरोध कारवाई करत त्यांना काढण्याचे आदेश दिले आहेत. तर ३ क्रू अधिका-यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना कारणे दाखवा नोटिस पाठवण्यात आली आहे.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अनिवार्य परवानाबाबत तसंच विश्रांती आणि इतर निकष पूर्ण न करता विमान कर्मचा-यांचं वेळापत्रक आणि उड्डाण निश्चित करण्यात आले होते. DGCA ने सुरक्षा उल्लंघनाची गंभीरता पाहता एअर इंडियाने दोषी कर्मचा-यांना त्वरित निलंबित करण्यात येण्याचे आदेश दिले.