नवी दिल्ली, (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विमान प्रवास हा आधुनिक काळातील अत्यंत जलद गतीने होणारा प्रवास असून यासाठी मात्र यासाठी मोठ्या प्रमाणावर भाडे द्यावे लागते. तरीही अत्यंत सोयी सुविधांनी युक्त असलेला जलप्रवास अनेक प्रवाशांसाठी सोयीस्कर करणारा असतो. त्यातही एअर इंडियाची विमान सेवा सर्वांनाच आवडते. मात्र आता टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियाने अलायन्स एअर आता उपकंपनी नसल्याचे म्हटले आहे. एअर इंडियाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आहे.
१ ) प्रवाशांना दिला अलर्ट: एअर इंडियाने प्रवाशांना कळवले आहे की, ज्या प्रवाशांकडे 4 अंकी फ्लाइट क्रमांक ‘9’ पासून सुरू होणारी तिकिटे आहेत त्यांची अलायन्स एअरने बुकिंग केली आहे. ‘9I’ ने सुरू होणाऱ्या 3-अंकी फ्लाइट क्रमांकांच्या तिकिटांवरही हेच लागू होते. अशा तिकीट धारकांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की, त्यांचे बुकिंग अलायन्स एअरचे आहे. एअर इंडियाने असेही म्हटले आहे की 15 एप्रिलपासून कंपनी यापुढे अलायन्स एअरशी संबंधित बुकिंग आणि ऑपरेशन्स हाताळणार नाही.
२ ) आता काय करावे: आपण अलायन्स एअरचे प्रवासी असाल तर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच दिलेल्या माहितीनुसार, +91-44-4255 4255 आणि +91-44-3511 3511 वर संपर्क साधावा. याशिवाय [email protected] या ईमेलवरही प्रवाशांना माहिती मिळू शकते. त्याच वेळी, कोणीही अलायन्स एअरच्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकतो.
३ ) संपादन प्रक्रिया पार पडली: गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टाटा सन्सची पूर्ण मालकीची उपकंपनी टेल्स प्रायव्हेट लिमिटेडने एअर इंडिया ताब्यात घेण्याची बोली जिंकली होती. टाटांनी 18,000 कोटींची बोली लावली होती. मात्र, या वर्षी जानेवारी महिन्यात संपूर्ण संपादन प्रक्रिया पार पडली. कर्जबाजारी विमान कंपनी एअर इंडिया आता टाटा समूहाची झाली आहे.