इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी एअर कंडिशनर (एसी) खरेदीकडे अनेकांचा कल असतो. परंतु काही वेळा एसी हा जीवाला धोका निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे. चेन्नई (तामिळनाडू) येथून अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. जिथे रात्री एसीमध्ये अचानक स्फोट झाला आणि खोलीत हजर असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. घटनेनंतर तरुणाचा जळालेला मृतदेह बाहेर काढण्यात आला.
ही घटना तामिळनाडूतील चेन्नईतील तिरुविका नगरमधील आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. त्यात म्हटले आहे की, रविवारी रात्री ही घटना घडली जेव्हा एअर कंडिशनरमधील स्फोटामुळे एका 28 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ती व्यक्ती खोलीत झोपली होती. तेव्हा हा प्रकार घडला आणि त्याच वेळी एक जबरदस्त स्फोट झाला.
तळमजल्यावरील एका खोलीत हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून पहिल्या मजल्यावर असलेल्या व्यक्तीचे वडील पळून गेले, तोपर्यंत खोलीला आग लागली होती. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला बोलावले, पण तोपर्यंत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दल आणि बचाव पथकाने सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे एअर कंडिशनरचा स्फोट झाला असावा. मात्र, स्फोट कशामुळे लागली याचा सध्या शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्याम असे मृताचे नाव असून तो स्थानिक परिसरात दुधाचे दुकान चालवतो. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची चौकशी सुरू केली. अग्निशमन दल आणि बचाव दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली त्यानंतर श्यामचा जळालेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
Air Conditioner AC Blast in Room Youth Burn alive Crime Accident Fire Chennai Tamilnadu