इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एआयएमआयएमचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी संभल येथील एका कार्यक्रमादरम्यान महिला आणि संतांबद्दल अशोभनीय आणि चिथावणीखोर वक्तव्य केले. त्याचे पडसाद आता उमटत आहेत या प्रकरणी शौकत अली तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष असद अब्दुल्ला आणि कार्यक्रमाचे आयोजक चौधरी मुशीर खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौधरी सराय, संभल येथील चौधरी मुशीर खान यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली म्हणाले की, मुस्लिमांनी ८३२ वर्षे राज्य केले तेव्हा हिंदू आमच्यासमोर हात जोडून हजेरी लावायचे. मुस्लिम अकबरने जोधाबाईशी लग्न करून मलिका-ए-हिंदुस्थान निर्माण केले होते. एआयएमआयएमच्या प्रदेशाध्यक्षांनी साधू-संतांबाबतही अशोभनीय वक्तव्य केले.
हिजाबबाबत शौकत अली यांनी भाजप देश तोडत असल्याचे म्हटले आहे. हिंदुत्व नाही, कोण काय घालणार हे संविधान ठरवेल. जेव्हा भाजप कमकुवत असतो तेव्हा मुस्लिमांचे धार्मिक मुद्दे घेऊन येतो. ज्ञानवापी खटल्यातील न्यायालयाच्या निर्णयावर शौकत अली म्हणाले की, न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल, परंतु १९९१ च्या उपासना कायद्यात पूर्वीच धार्मिक स्थळे कायम राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.
अली यांचे चिथावणीखोर वक्तव्य शनिवारी व्हायरल झाल्यानंतर संतापासह कारवाईची मागणीही जोर धरू लागली. यानंतर पोलिसांनी एआयएमआयएमच्या प्रदेशाध्यक्षासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अली यांच्यासह जिल्हाध्यक्ष असद अब्दुल्ला आणि कार्यक्रमाचे आयोजक चौधरी मुशीर खान यांच्याविरोधात हिंदू संघटनेचे कार्यकर्ते अक्षित अग्रवाल यांनी तक्रार दाखल केली. चौधरी मुशीर खान यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत असद अब्दुल्ला यांच्या उपस्थितीत शौकत अली यांनी हिंदू धर्म, संत आणि महिलांविरोधात आक्षेपार्ह भाषण केल्याने त्यांच्या आणि समाजातील इतर लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगितले. यामुळे वातावरण चिघळत राहिल. तसेच, अली यांच्या भाषणाचा व्हिडिओही अक्षित अग्रवालने पोलिसांना दिला. याची दखल पोलिसांनी घेतली. पोलिस अधिक्षक चक्रेश मिश्रा यांनी सांगितले की, अक्षित अग्रवाल यांच्या तक्रारीवरून शौकत अली, असद अब्दुल्ला आणि चौधरी मुशीर खान यांच्याविरुद्ध कलम १५३ए, २९५ए आणि १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://twitter.com/sardesairajdeep/status/1581291282378678272?s=20&t=UUg26mNPkkpidXdsnKZvow
AIMIM UP President Shaukat Ali Controversial Statement on Hindu