इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २७ पर्यंटकांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील दोन नागरिकांचा समावेश आहे. यात हल्ल्यात दिलीप डिसले आणि अतुल मोने हे महाराष्ट्रातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला.
या हल्ल्यानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, पहलगाममध्ये काल घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि आम्हाला आशा आहे की सरकार या दहशतवाद्यांना शिक्षा करेल. दहशतवाद्यांनी मारलेल्या सर्व कुटुंबांसोबत आम्ही उभे आहोत आणि जखमी झालेल्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी इच्छा करतो… ही घटना उरी आणि पुलवामा हल्ल्यांपेक्षाही निंदनीय आहे. यावेळी दहशतवाद्यांनी नागरिकांना लक्ष्य केले. हा एक नरसंहार आहे…
दरम्यान या हल्ल्यानंतर देशभरातून विविध संघटना व राजकीय पक्ष या घटनेचा निषेध करत आहे. या घटनेवरुन देशात तीव्र संताप असून सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.