नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनच्या (आयमा) निवडणुकीत धनजंय बेळे आणि वरुण तलवार यांच्या नेतृत्वाखालील एकता पॅनलने सरशी केली आहे. ३० पैकी २४ जागेची कार्यकारणी सदस्यपासाठीची मतमोजणी झाली असून त्यात एकता सर्व उमेदवार विजयी झाले आहे. आता पदाधिक-यांच्या पदाची मतमोजणी होणार असून त्यात एकताचाच विजय होईल असे पॅनलतर्फे सांगण्यात आले.
सकाळपासून आज मतमोजणी झाली. दुपारपर्यंत १००० मतांची मोजणी करण्यात आली. त्यात एकता पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी दुप्पटीच्या बरोबरीने मते घेतली. त्यानंतर अंतिम निकाल सुध्दा हाती आला आहे. या निवडणुकीत १३७९ मतदान झाले होते. त्यात ४१ मते बाद झाली. त्यात १३३८ मतांची मतमोजणी झाली. त्यात एकताने बाजी मारली. या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनल विरोधात शशिकांत जाधव आणि तुषार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उद्योग विकास आघाडीने उमेदवार उभे केले होते. पण, त्यांचा पराभव झाला आहे. पदाधिका-यांच्या निवडणुकीत त्यांना कितपत यश मिळते ही उत्सुकता आहे.
या निवडणुकीत चांगली चुरस वाढली होती. गेल्या अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक गाजली. निवडणूक आयमाची असली तरी या निवडणुकीवर निमाचा इम्पॅक्ट होता. निमाच्या सत्ताधारी सदस्यांचा कारभार, त्यानंतर निवडणुकीसाठी रंगलेलेले राजकारण यामुळे त्याचा परिणामही आयमाच्या निवडणुकीवर झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. उद्योजकांच्या या निवडणुकीत राजकारणाने शिरकाव केल्यामुळे उद्योजक सभासदांमध्ये संताप होता. तो या निवडणुकीच्या वाटे बाहेर आल्याचेही समोर आले आहे.
या निवडणुकीत ३० जागांसाठी एकूण ५९ उद्योजक उमेदवार रिंगणात होते. सत्ताधारी एकता पॅनलने ३० उमेदवार रिंगणात उतरवले होते. तर विरोधी गटाने उद्योग विकास पॅनलची स्थापना करुन २९ उमेदवारांना उभे केले होते. एकता पॅनल पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी निखिल पांचाळ तर सेक्रेटरीपदासाठी मनिष बुब हे रिंगणात आहे. तर उद्योग विकास आघाडी पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी संजय महाजन तर सेक्रेटरीपदासाठी एन.डी. ठाकरे रिंगणात आहेत. त्यांचाही निकाल काही वेळात लागणार आहे. रविवारी आयामची ही निवडणूक २०२२-२०२४ या वर्षाकरिता निवडणूक रविवार झाली. त्यानंतर मतमोजणी सोमवारी सुरु झाली. ही मतमोजणी रात्री उशीरापर्यंत चालणार आहे.
अंतिम निकाल ईसी मेबर (२४) कार्यकारणी सदस्य
एकता पॅनलचे विजयी उमेदवार
१) आहेर जितेंद्र –
२) अलीमचंदानी जयदीप –
३) बजाज सुमित –
४)बेळे हर्षद –
५)बोडके अविनाश –
६)ब्राह्मणकर हर्षद –
७)धारकर गौरव –
८)डोंगरे सुदर्शन –
९)गडकरी विराज –
१०)गांगुर्डे राहुल –
११गुप्ता मेघा –
१२)जोगळेकर जयंत –
१३)खोंड हेमंत –
१४)मराठे अविनाश –
१५)मोरे विनायक –
१६)नाईकवाडे राधाकृष्ण –
१७)पगार जयंत –
१८)पाटील जगदीश –
१९पाटील करणसिंग –
२०)राणे देवेंद्र –
२१)रावल मनीष –
२२)वाघ दीलीप –
२३)वाघ प्रमोद –
२४)झोपे रवींद्र –