इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कराडमधील नामांकित दोन महिला डॅाक्टरांचे AI च्या माध्यमातून अश्लिल व्हिडिओ बनवल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा संशयित डॅाक्टर म्हणून घेणारा असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करत आहे.
हे व्हिडिओ परराज्यातून तयार करण्यात आले असून ते बनावट असल्याचे समोर आले आहे. एआयच्या सहाय्याने ते तयार करण्यात आले. व्हिडिओमध्ये संबधित महिला डॅाक्टर दोन युवकांसोबत अश्लिल चाळे करत असल्याचे दाखवण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होवू नये म्हणून संबधित डॅाक्टरांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
त्यानंतर पोलिसांनी एक डॅाक्टरसह दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरु असून या घटनेचा सूत्रधार स्वत.ला डॅाक्टर असल्याचे सांगत होता.