अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय महामार्ग क्र. ५६१ अ वाळुंज बायपास ते मुट्ठी चौक दरम्यान रस्ता रुंदीकरण तसेच एमआयआरसी गेट नं. ४ व रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावरून सुरु असलेल्या अवजड वाहतुकीमुळे उड्डाणपुलाचे कामामध्ये व्यत्यय येत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१)(ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन मुट्टी चौक ते वाळुंज बायपास दरम्यान अहमदनगर शहरातून प्रवेश देण्यात आलेली जड वाहतुक १७ ऑगस्ट २०२३ रोजीचे ८ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.
सोलापुरकडून वाळुंज बायपास येथुन मुट्ठी चौक मार्गे अहमदनगर शहरातील बाजारपेठेत माल घेवुन येणारे तसेच जिवनावश्यक वस्तूंची वाहतुक करणारी जड वाहने वाळुंज बायपास -अरणगाव बायपास- कायनेटिक चौक मार्गे जातील. मुट्ठी चौकमार्गे वाळुंज बायपासकडे जाणारे जड वाहने चांदणी चौक-कायनेटीक चौक-अरणगाव बायपास- वाळुंज बायपास मार्गे जातील. तसेच वाळुंज बायपास ते मुट्ठी चौक या मार्गावरुन अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. हा आदेश शासकीय वाहने, लष्कराची वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व स्थानिक परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
ahmednagar traffic diversion police
valunj bypass mutthi chowk