अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात धर्मांतराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आताचा हा प्रकार राहुरी फॅक्टरी येथील आहे. डिपॉल स्कुलमध्ये शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय शीख धर्मीय विद्यार्थ्याने याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. डी पॉल इंग्लिश मिडियम स्कूलचा उपप्राचार्य फादर जेम्सने विद्यार्थ्याला धमकावून बळजबरी धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने फादर जेम्स यास रात्री ताब्यात घेतले आहे.
पंजाब येथील कमलसिंघ पास्टर याने राहुरीत येऊन पैशांच्या अमिषाद्वारे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला होता. पण सदर प्रकार स्थानिक नागरिकांचा सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. याप्रकरणी पास्टर विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ताजे असताना आता दुसरा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूलमधील १४ वर्षीय विद्यार्थ्याने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मी व माझे दोन मित्र शाळेच्या झाडाखाली क्रीडा स्पर्धेकरिता उभे होतो. त्यावेळी उपप्राचार्य फादर जेम्स तेथे आले. डोक्यावर घातलेली पगडी काढून घे, केस कापून शाळेतील इतर विद्यार्थ्यांप्रमाणे रहा, आमच्या धर्माचा स्वीकार कर, अशी दमदाटी करीत मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. या तक्रारीची दखल घेत फादर जेन्स विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तसेच या बाबत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपी फादर जेम्स यास राहुरी फॅक्टरी परिसरातून ताब्यात घेतले आहे.
Ahmednagar Rahuri Factory Religious Transformation FIR
Crime