अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुस्लिम बांधवांच्या ‘बकरी ईद’ या सणाच्या रविवार, १० जूलै रोजी ‘कोठला ईदगाह’ मैदानावर नमाज होणार आहे. हे मैदान हे अहमदनगर – पुणे महामार्गालगत आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनांची गर्दी होऊ नये. यासाठी येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
अहमदनगर – पुणे मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या कर्कश आवाज / हॉर्न यामुळे नमाज पठणात व्यत्यय येतो. तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होवू नये आणि कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ब) नुसार १० जूलै २०२२ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत येथील वाहतूक वळविण्यात आली आहे.
औरंगाबाद रोड कडून येणारी जड व इतर सर्व प्रकारची चारचाकी वाहने एसपीओ चौक, न्यायनगर मार्गे, बेलेश्वर चौक, किल्ला चौक, जीपीओ चौक, चांदणी चौक मार्गे वळविण्यात आली आहेत. पुणे रोडकडून येणारी जड व इतर सर्व प्रकारची वाहने जीपीओ चौक, किल्ला चौक, बेलेश्वर चौक, न्याय नगर मार्गे, एसपीओ चौकाकडे वळविण्यात आली आहेत. असेही मनोज पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
Ahmednagar Pune Highway City Traffic Change Bakri Eid Traffic Diversion