अहमदनग (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाचखोरीची कीड अतिशय खोलवर रुजली आहे. विशेष म्हणजे, नव्याने रुजू झालेले म्हणजेच परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षकही यातून सुटलेले नाहीत. नगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात दोन जण सापडले आहेत. ज्योती मच्छिन्द्र डोके (पोलिस उपनिरीक्षक (परिविक्षाधीन), वय २६ वर्षे, एमआयडीसी पोलीस स्टेशन, अहमदनगर, रा. मूळ. मु.पो. आढळगाव , ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर. सध्या रा. दुध डेअरी चौक, दत्त मंदिरा जवळ, वडगाव गुप्ता शिवार, अहमदनगर) आणि पोलिस हवालदार संदीप रावसाहेब खेंगट (वय ४६ वर्षे, नेमणूक एमआयडीसी पोलीस स्टेशन, अहमदनगर. रा. मु. पो. बाभुर्डी बेंद, नगर दौंड रोड, ता. जि.अहमदनगर.) अशी या लाचखोरांची नावे आहेत.
एका व्यक्तीच्या मुलाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाणे अहमदनगर येथे विनयभंग व पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर झाली आहे. त्यात त्याला जामीन लवकर मिळण्याकरिता मदत करणे आणि न्यायालयाने म्हणणे मागितल्यावर लवकर न देणे या कारणासाठी लाचखोर पीएसआय डोके आणि हवालदार खेंगट यांनी ८ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. एसीबीने सापळा रचला आणि त्यात दोघेही रंगेहाथ सापडले. अखेर याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा अधिकारी
श्रीमती गायत्री म. जाधव , पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो.न. 7588516042
सापळा पथक-
पो. हवा. चंद्रशेखर मोरे. पो. ना. प्रकाश महाजन . चा.पो.हवा. संतोष गांगुर्डे .
मार्गदर्शक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
मा. श्री.नारायण न्याहाळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक. मो.न. 9823291148
मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230, 02532575628
टोल फ्री क्रमांक १०६४
Ahmednagar PSI Police ACB Trap Bribe Corruption