अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदनगर जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 360 जागांची वाढ झाली आहे. त्यामुळे इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होणार आहेत. अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस.डी.शिंदे यांनी दिली आहे.
नेवासा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी इलेक्ट्रीशियन, वेल्डर , वायरमन अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी 20 प्रवेश क्षमतेच्या प्रत्येकी एक असा तीन तुकड्या सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. संगमनेर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी इलेक्ट्रीशियन, फिटर, अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी 40 प्रवेश क्षमतेच्या प्रत्येकी एक असा एकूण दोन व वेल्डरसाठी 20 क्षमतेची एक तुकड्या सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. राहूरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी इलेक्ट्रीशियन अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी 40 प्रवेश क्षमतेच्या दोन तुकड्या सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.
श्रीगोंदा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी इलेक्ट्रीशियन, फिटर अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी 20 प्रवेश क्षमतेची प्रत्येकी एक असा दोन तुकड्या सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. पारनेर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी इलेक्ट्रीशियन 20 प्रवेश क्षमतेची 1 तुकडी, फिटर अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी 40 प्रवेश क्षमतेच्या दोन तुकड्या सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. र्शिर्डी साई रुलर इन्स्टिट्यूटसाठी इलेक्ट्रिशियन, डिझेल मेकॅनिक या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी दोन तुकड्या प्रत्येकी 40 क्षमतेच्या सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. अशी माहिती ही श्री.शिंदे यांनी दिली.
ahmednagar district iti seats increased students benefit
Education Skill Development Government