अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेंन्द्र भोसले यांनी त्यांना प्राप्त अधिकारानूसार दि. 24 नोव्हेंबर,2022 पर्यंत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 37 (1) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रतिबंधात्मक कालावधीत कोणत्याही इसमास शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तींचे अथवा मृतदेहांचे किंवा त्यांच्या आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल अशी व सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये मानहानी करण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी कृती व आवेशपूर्ण भाषणे करणे, अंगविक्षेप करणे, किंवा विडंबन करणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा प्रसार करण्यास मनाई राहील. मात्र शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव काठी वापरणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींना सदरचा वापर अनुज्ञेय राहील, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
Ahmednagar District Collector Order