गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भूकंपाची नोंद? जिल्हाधिकारी म्हणाले…

by India Darpan
नोव्हेंबर 23, 2022 | 6:35 pm
in स्थानिक बातम्या
0
bhukamp

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये 22 नोव्हेंबर, 2022 रोजी रात्री 09.00 ते 09.30 वा. दरम्यान नागरिकांच्या घरांना हादरा बसल्याबाबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत भूकंपमापन केंद्र, मेरी, नाशिक येथील अधिका-यांशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधला असता भूकंपमापन केंद्रावर भूकंपाची नोंद झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता भूकंपाबाबत अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.

भूकंप या आपत्तीच्या अनुषंगाने नागरिकांनी खालीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन
भूकंपापूर्वी घ्यावयाची काळजीः-
 भूकंपाची पूर्वसूचना मिळत नाही, त्यामुळे भूकंपाचा धक्का कधीही बसू शकतो असे गृहीत धरून सतत दक्षता घेणे. भूकंप का होतो त्याची कारणे व होणा-या परीणामांबाबत चर्चा करा. घराची नियमित पहाणी करुन दुरुस्ती करणे जरुरीचे आहे, भिंतींना तडे गेले असतील तर ते बुजविणे व भिंतींची मजबुती करणे आवश्यक आहे. लोडबेअरींग घर बांधताना प्रत्येक खोलीच्या चारही कोप-यांचे मजबुतीकरण करण्यासाठी सलोह कॉक्रीट वापरणे व त्याची प्लींथ, लिंटल व रुफ बँडमध्ये सांधणी करणे आवश्यक आहे. आपल्या घरातील, कामाच्या ठिकाणी व सार्वजनिक इमारतींमधील सुरक्षीत बाहेर पडण्याचे मार्ग जाणून व समजून घ्या. अवजड आणि मोठया वस्तु शक्यतो जमिनीलगत ठेवा, उंच जागेवर ठेऊ नका. घरातील कपाटे, अवजड फ्रेम्स भिंतीवर व्यवस्थी लावाव्यात.

भूकंपा दरम्यान काय करावे
स्वत: शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा. जर तुम्ही घरात, इमारतीच्या आत असाल, टेबलाखाली अथवा पलंगाखाली बसून स्वत:चा बचाव करा. कॉलमजवळ, दरवाज्याजवळ, चौकटीखाली उभे राहुन स्वत:चा बचाव करा. लिफ्टचा वापर करु नका. दाराजवळ अथवा प्रवेशद्वाराजवळ गर्दी करु नका. भिंती, आरसे, फर्निचर, कंदील यांचेपासून लांब रहा. शक्यतो चादर, उशी अथवा कपडयाची घडी डोक्यावर घ्या, जेणेकरुन इजा होणार नाही. जर, तुम्ही रस्याकावर असाल तर पटकन मोकळया जागेत जा, घाई गडबड करु नका. रस्याेणच्या कडेने जात असाल तर उंच जुन्या आणि सलग असणा-या इमारतीपासून लांब रहा. भिंती, वीजेच्या तारा आणि अंगावर पडण्याची शक्यता असेल अशा वस्तूंपासुन दूर रहा. जर, तुम्ही गाडी चालवत असाल तर जुन्या इमारती, भिंती, इलेक्ट्रीक वायर, केबल व उंचवटा यापासून आपले वाहन दूर नेऊन थांबवा.

भूकंपानंतर काय करावे
शांत रहा, रेडीओ, टिव्हीद्वारे मिळणा-या सूचना काळजीपूर्वक ऐका व त्यांचे पालन करा. भूकंपानंतर अनेक अफवा उठतात उदा. जमिनीला भेगा पडल्या इत्यादी खात्री शिवाय अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. अफवा पसरवू नका. भुकंपाच्या मुख्य धक्क्यानंतर छोटे धक्के बसू शकतात. त्यामुळे पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरु असल्यास बंद ठेवा. काडी ओढू नका. विजेचे बटन लगेचच चालू करु नका, कारण गॅस गळती अथवा शॉर्टसर्कीट होण्याची शक्यता असते. जर काही व्यक्ती जमिनीखाली बदल्या गेल्या असतील तर मदत तुकडीशी संपर्क साधावा. दुषीत, उघडयावरचे पाणी पिणे टाळा, जेणेकरुन रोगांना प्रतिबंध होईल. भुकंपाच्या धक्क्यांमुळे ज्या घरांना,इमारतींना फार मोठे तडे गेले आहेत त्या इमारतींचा राहण्यासाठी वापर करु नये.

नागरिकांनी घाबरुन न जाता भूकंपाबाबत अफवा पसरवू नये वा अफवांवर विश्वास ठेवू नये. घरांना हादरा बसल्यास सुरक्षितरित्या घराबाहेर पडावे. जुनाट, मोडकळीस आलेल्या वा दगड मातीचे कच्चे बांधकाम असलेल्या घरात राहणा-या नागरिकांनी विशेषतः दक्षता घेण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Ahmednagar District Collector on Earthquake

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लासलगाव – मनमाड दरम्यान चालत्या रेल्वेत माथेफिरूने प्रवाशावर अ‍ॅसिड सदृष्य पदार्थ फेकले

Next Post

अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वेचा शुभारंभ; या स्थानकांवर थांबणार, अशी मिळेल सेवा

India Darpan

Next Post
unnamed 15

अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वेचा शुभारंभ; या स्थानकांवर थांबणार, अशी मिळेल सेवा

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011