शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात अव्वल; बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

by Gautam Sancheti
जून 11, 2023 | 5:03 am
in राज्य
0
insurance policy

 

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ७१९३९ ऑनलाईन प्राप्त प्रकरणांपैकी ६३१७८ जातवैधता प्रमाणपत्र वाटप करत राज्यात अव्वल ठरली आहे. याकामासोबतच समितीने बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. समितीने ११२ प्रकरणे अवैध ठरविलेली आहेत. एकेकडे राज्यात सर्वाधिक प्रकरणे निर्गमित करण्याबरोबरच बनावटगिरीला चाप लावण्याचे काम करणारी अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात एकमेव आहे. जिल्हा समितीच्या या उल्लेखनीय कामकाजाबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनिल वारे यांनी कौतूक केले आहे.

अहमदनगर ‍जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जातवैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विविध उपक्रम, विशेष मोहीमा वेळोवेळी राबविण्यात येत आहेत. समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, सुयोग्य व्यवस्थापन, जलद निर्णय प्रक्रिया व तालुकास्तरावर घेतलेले शिबिरे या माध्यमातून समितीने जलद कामकाज केले आहे. राज्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितींच्या कामकाजावर सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) या स्वायत्त संस्थेचे नियंत्रण आहे.

बार्टीने चे महासंचालक सुनिल वारे यांनी अहमदनगर जिल्हा समितीला ८ जून २०२३ रोजी अभिनंदनपर पत्र पाठवून समितीच्या कामकाजाचे कौतूक केले आहे. समितीने राबविलेल्या उल्लेखनीय उपक्रमांची प्रशंसा केली आहे. यापुढील काळात ही समितीने कामात सातत्य, तत्परता व पारदर्शकता राखल राज्यात अव्वल क्रमांक टिकवण्याची परंपरा अबाधित ठेवावी. अशा सूचनाही केल्या आहेत.

अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सेवा पंधरवड्यानिमित्ताने राबविलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातूनजातवैधता पडताळणी प्रमाणपत्रांचे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन वाटप केले. जिल्ह्यातील १११ महाविद्यालयांमधील प्राचार्य व कर्मचाऱ्यांना जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या ऑनलाईन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. जातप्रमाणपत्र वाटप करतांना त्रुटी राहू नयेत म्हणून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची ऑनलाईन वेबनार द्वारे कार्यशाळा घेण्यात आल्या.

जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज कसे भरावेत? त्यासोबत कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे? शाळा, महाविद्यालय यांनी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे? विद्यार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव कशा प्रकारे सादर करावेत? ऑनलाइन अर्जांचा भरणा कसा करावा? त्यानंतर काय प्रक्रिया अंवलबिण्यात यावी. या विषयांवर साध्या व सोप्या भाषेत विद्यार्थी, पालक, प्राचार्य व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राहाता, संगमनेर, नेवासा, श्रीगोंदा, पारनेर व कोपरगाव या याठिकाणी २ ते ३ तालुक्यांच्या समावेशासह कार्यशाळा घेण्यात आल्या. कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा व प्रमाणपत्र वितरणाचा लाभ जिल्ह्यातील १११ महाविद्यालयांमधील प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घेतला.

जिल्हा समित्यांचे कामकाज ऑनलाईन झाले आहे. https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो. निवडणूक, सेवा व शैक्षणिक कारणास्तव जातपडताळणी समित्यांकडे अर्ज करता येतो. समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या या समित्यांकडे एससी, ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी या जातप्रवर्गासाठी अर्ज करता येतो. जात प्रमाणपत्राची सत्यता तपासण्यासाठी समितीला किमान पाच महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, ही प्रक्रिया ऑगस्ट २०२० पासून ऑनलाईन झाल्याने कामात तत्परता आली आहे.

अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीवर तीन सदस्यांचा समावेश आहे‌. सध्या अहमदनगर समितीत अध्यक्ष म्हणून अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास मारूती पानसरे, सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख व सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भागवत खरे हे कामकाज पाहतात. याशिवाय समितीला क्षेत्रीय चौकशीकामी सहाय्य करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई यांचा समावेश असलेले दक्षता पथक कार्यरत असते.

‘‘चुकीच्या माणसाला लाभ न दिला जाता योग्य लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मंजूर झाला पाहिजे. यासाठी जात वैधता प्रमाणपत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अहमदनगर समितीने आपल्या कामात तत्परता व पारदर्शकता आणली आहे. प्रत्यक्ष तालुकास्तरावर शिबिरे घेत लाभार्थी विद्यार्थी व नागरिकांना थेट प्रमाणपत्र वाटप केले आहे.’’ अशी प्रतिक्रिया समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास मारूती पानसरे यांनी दिली आहे.

Ahmednagar District Caste Validity Certificate

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

आयआयएफएल फायनान्स रोख्यांवर ९ टक्के पर्यंत व्याज देणार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Untitled 14
महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान टँकरने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी….कर्नाटकातील घटना

सप्टेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
sushila kargi
मुख्य बातमी

अखेर नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की …अंतरिम सरकार स्थापन

सप्टेंबर 12, 2025
Next Post
investment

आयआयएफएल फायनान्स रोख्यांवर ९ टक्के पर्यंत व्याज देणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011