रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अहमदनगर जिल्ह्यातील ७०२ विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप

फेब्रुवारी 12, 2023 | 6:38 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230212 WA0009 e1676207105585

 

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) नागपूर मार्फत अहमदनगर जिल्ह्यातील ७०२ विद्यार्थ्यांना खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या हस्ते मोफत टॅबचे आज वितरण करण्यात आले. यावेळी इतर मागासवर्ग बहूजन कल्याण विभागाचे नाशिक विभाग उपसंचालक डॉ.भगवान वीर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, समाजकल्याण सहायक आयुक्त राधाकिसन देवढे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

महाज्योती या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास – प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, जीईई/नीट/एमएचटी-सीईटी/एमपीएससी/युपीएससी आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. या योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्हयातील विदयार्थ्यांसाठी महाज्योती मार्फत ९६१ टॅब प्राप्त झाले आहेत. यापैकी ७०२ टॅबचे आज वितरण करण्यात आले. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत टॅबलेट सोबत दररोज ६ जीबी इंटरनेटचा डाटा मोफत दिला जातो.

खासदार डॉ.विखे पाटील यावेळी म्हणाले की, महाज्योतीच्या टॅबमुळे अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या प्रशिक्षणाची पुस्तके अपलोड करता येणार आहेत‌. ऑनलाईन पद्धतीने स्वतःचा अभ्यास पूर्ण करता येणार आहे. विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत तसेच आपल्या शिक्षकांसोबत अभ्यासासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकणार आहेत‌. टॅब हे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वरदान ठरणार आहेत.

डॉ.वीर म्हणाले, महाज्योती मोफत टॅबलेट योजना राज्यातील विद्यार्थ्यांना डिजिटली दुनियेत एक पाऊल पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरेल. राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल. या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनतील. उर्वरित २५९ टॅबचे अद्याप वितरण बाकी आहे. हे टॅब प्राप्त करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचे व पालकांचे आधारकार्ड, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, इयत्ता १०वी चे गुणपत्रक व बोनाफाईड प्रमाणपत्रासह सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, अहमदनगर कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन श्री. देवढे यांनी केले आहे.

Ahmednagar District 702 Students Free Tab Distribution

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्री गजानन महाराज प्रकट दिन विशेष – असे आहे इंदिरानगरचे भव्य मंदिर

Next Post

शेफ विष्णू मनोहर यांनी केला जागतिक विक्रम! नाशिककरांना खाऊ घातली तब्बल ४ हजार किलो भगर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
IMG 20230212 WA0008

शेफ विष्णू मनोहर यांनी केला जागतिक विक्रम! नाशिककरांना खाऊ घातली तब्बल ४ हजार किलो भगर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011