अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात पोलिसांच्या उपस्थितीत तहसीलदारांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एका गावात वादातील रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांच्यावर एका गटाने हल्ला करत मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे मोठा पोलीस बंदोबस्त असताना ही घटना घडल्याने पोलिसांच्या धोरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, त्यानंतर तहसीलदार बिरादार यांच्या फिर्यादीवरून आता संबंधितांवर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
ही आहे मागणी
नेवासा फाटा येथील शांतीनगर वसाहतीतील वहिवाटीचा रस्ता खुला करुन मिळावा या मागणीसाठी येथील संतप्त महिला-पुरुषांनी एकत्र येत नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावरील राजमुद्रा चौकात सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. या रास्ता रोको आंदोलनानंतर उपस्थित संतप्त महिला , पुरुष नागरिकांनी वहिवाटीचा रस्ता त्वरीत खुला करण्याची मागणी तहसीलदार संजय बिरादार यांच्याकडे केली व रास्ता रोको झाल्यानंतर या जमावाने एका कुटुंबातील मालकी हक्काच्या असलेल्या जागेवरील वहिवाटीच्या रस्त्यावर तार कंपाऊंड केलेले असल्याचा आरोप आंदोलकांनी करुन हा रस्ता वहिवाटीसाठी खुला करण्याची मागणी तहसिलदार बिरादार यांच्याकडे केली. यावेळी हा रस्ता नागरीकांची अडचण म्हणून तात्पुरता खुला करुन देत आहोत, असे पंचनाम्यात नमुद केले असल्यामुळे जमावातील आंदोलकांनी विजयाच्या घोषणा दिल्या.
धक्काबुक्की व मारहाण
तहसीलदार बिरादार यांनी हा रस्ता खुला करून देण्याच्या निर्णयाची लेखी आम्हाला द्या अशी मागणी तहसिलदार बिरादार यांच्याकडे केली असता तहसिलदारांनी ही मागणी अमान्य केल्यामुळे घुले बंधूचा राग अनावर झाला्. करणसिंह भाऊसाहेब घुले, सत्यजित भाऊसाहेब घुले व ज्ञानेश्वर वसंत घुले यांनी तहसिलदार बिरादार यांना धक्काबुक्की करत मारहाण केली.यावेळी आंदोलनातील जमावाने घुले बंधूवर सामुहिक हल्ला केला व जमावांनी घुले बंधूना पत्र्याच्या शेडमध्ये गेलेले असतांना हा जमाव घुले बंधूकडे चालून आला असता पोलीस हवालदार जयवंत तोडमल यांनी घुले बंधूना बाहेर काढले. धक्कादायक बाब म्हणजे मोठा पोलीस बंदोबस्त असताना ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
Ahmednagar Crime Nevasa Tehsildar Beaten