रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अपर जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदारांसह ३२ जणांवर गुन्हा दाखल… नगर जिल्ह्यात खळबळ

जुलै 20, 2023 | 2:26 pm
in संमिश्र वार्ता
0
fir.jpg1

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अप्पर जिल्हाधिकऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि एकूण ३२ जणांवर एकाचवेळी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यात अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (प्रांत), तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व सह दुय्यम निबंधक अशा एकूण ६ अधिकारी व कर्मचारी यांचेसह ३२ खासगी व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले सर्व अधिकारी कर्मचारी हे २००६ च्या दरम्यान अहमदनगर येथे कार्यरत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ,३ जानेवारी २००६ रोजीचे पूर्वी ते ६ जानेवारी २००६ रोजी मौजे वडगांव गुप्ता शिवारातील गट नं.२०३ क्षेत्र २ हेक्टर, ९७ आर पोट खराबा ०.०९ आर. गट नं.२०५ एकुण क्षेत्र १ हेक्टर ३४ आर ही कनिष्ट महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ब ची जमिन जुन्या शर्तीवर करणेसाठी अटी व शर्तीवर तत्कालीन तहसिलदार अहमदनगर यांनी बेकायदेशीर परवानगी दिली आहे. यातील तहसिलदार एल. एन. पाटिल यांनी काढलेल्या आदेशास, तत्कालीन तलाठी एल. एस. रोहकले, दुर्गे, तत्कालीन मंडळ अधिकारी, नालेगांव यांनी मदत केली आहे व खरेदी विक्री व्यवहाराच्या नियमबाहय फेरफार- नोंदी घेऊन खासगी व्यक्ती उत्कर्ष पाटिल व अजित लुकड यांना मदत केली आहे.

सदरचा आदेश बेकायदेशीर असल्याची माहिती तत्कालीन अपर जिल्हाधिकारी व्ही. टी. जरे आणि तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुठे यांना होती. तरीदेखील त्यांनी कुठलीही कारवाई न करता, बेकायदेशीर व्यवहारात सहभाग घेतला. या व्यवहारास एक प्रकारे प्रोत्साहन दिले आहे. त्याचबरोबर लोकसेवक दिलीप बबन निराली, तत्कालीन सह दुय्यम निबंधक, अहमदनगर- २ यांनी खरेदी विक्रीचे बेकायदेशीरपणे दस्त नोंदविले.

तसेच नमुद जमिनीचे भोगवटादार दिनकर आनंदा शिंदे, विनायक शंकर शिंदे, बाबु आनंदराव शिंदे, मोहन आनंदराव शिंदे, वामन किसन शिंदे, यादव किसन शिंदे, सदाशिव केशव शिंदे, रामभाऊ केशव शिंदे, सुनिल केशव शिंदे, यादव केशव शिंदे, श्रीमती मालनबाई केशव शिंदे, श्रीमती लता शांतवण भाकरे, अरुण दगडु शिंदे, शालनबाई दगडु शिंदे, लक्ष्मण रामचंद्र शिंदे, मथुरा विष्णु शिंदे, संदिप विष्णु शिंदे, सुनिता रतन गायकवाड, नंदा शाम घाटविसावे, शालुबाई शाहुराव प्रभुणे, मच्छिंद्र आनंदाव शिंदे, लिलाबाई चंद्रभान पाडळे, शोभा बुध्दीराम ठाकुर, तसेच संमती देणार वत्सलाबाई तुकाराम पाचारणे, सुशिला शांतवण घाटविसावे, तुळसाबाई मारुती नरवडे, छबुबाई भिवाजी साळवे, इंद्रायणी विठठल जाधव, वत्सला वामन जाधव, कौसल्या दामु जगताप यांचे जनरल मुखत्यार उत्कर्ष सुरेश पाटील, रा. श्रमिकनगर आनंदऋषीजी मार्ग अहमदनगर व जमिन खरेदी करणारे अजित कचरदास लुंकड, रा. आनंद दर्शन अपार्टमेंट, मार्केट यार्ड, अहमदनगर यांना सदरची जमिन ही महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ ची जमिन असल्याचे माहित असू देखील त्यांनी वरिल नमुद तहसिलदार यांना सदर जमिन जुन्या शर्तीवर करणेसाठी अटी व शर्तीवर परवानगी देण्यासाठी मदत करुन, खोटे कागदपत्र तयार करून, सदर जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करुन दस्त नोंदणी करुन ७/१२ उता-यावर व फेरफार नोंदी घेतलेल्या आहेत व दस्त तयार करून शासनाची फसवणुक केली आहे.

या सर्व प्रकाराबाबत एम.आय.डी.सी. पो.स्टे., जि.अहमदनगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम १३(१)(ड) सह १३(२) सह भा.दं.वि. क.१६७ ४२० १०९ प्रमाणे दि.१९/०७/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक प्रविण लोखंडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर हे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या एमजी रोडवरील मोबाईल दुकानांवर पोलिसांचे छापे

Next Post

इर्शाळवाडी दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात दिली ही माहिती (Video)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
इर्शाळवाडी

इर्शाळवाडी दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात दिली ही माहिती (Video)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011