अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतीच्या वादातून हाणामारी होणे काही नवीन गोष्ट नाही, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अशा घटना नेहमीच घडत असतात. नगर जिल्ह्यात देखील असाच एक प्रकार घडला असून यामुळे त्या गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अहमदनगर तालुक्यातील अकोळनेर येथे शेतीच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. शेतातील रस्त्याच्या वादातून २ गट समोरासमोर आले आणि नंतर त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर तलवारी आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. या खमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्या हाणामारीचा व्हिडिओही…
मिळालेल्या शेतातील रस्त्यावर शेततळे बांधण्याच्या विषयावरून या दोन्ही गटात वाद झाल्याची प्रथमिक माहिती समोर आली आहे. या हाणामारीचा व्हिडिओही आता समोर आला आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादींवरुन १३ जणांसह इतर २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण शेतातील रस्त्यावर एका गटाने शेततळे बांधण्यासाठी काम सुरू केले होते. या शेततळ्यावरून हा वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर नंतर जोरदार हाणामारीत झालं. यावेळी तलवारींसह लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांनी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना जबर मारहाण केली.
दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे…
वास्तविक पाहता शेतीचा वाद हा अनेक दिवसांपासून होता, गावातील काही लोकांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाद मिटतच नव्हता आणि अखेर या वादाची ठिणगी पडली आणि ही हाणामारीची घटना घडली. या तुफान हाणामारीत एका गटातील बाळासाहेब शंकर शेळके, आदेश बाळासाहेब शेळके, निलेश नाथा देशमुख, नाथा मुरलीधर देशमुख हे ४ जण तर दुसर्या गटातील सीताराम उर्फ बाळासाहेब नारायण गारुडकर, शुभम सीताराम गारुडकर, विनायक सीताराम गारुडकर हे ३ असे एकूण ७ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
Ahmednagar Crime Farmer Fight