अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोहरम, दहीहंडी व गणेशोत्सव या उत्सव काळात जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण व समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हयामध्ये ८ व ९ ऑगस्ट रोजी मोहरम, १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी व ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सव कालावधीत प्राप्त झालेल्या तक्रारी निराकरण करणेसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी (समन्वय) म्हणून आर.जी.दिवाण (उपचिटणीस तथा नायब तहसिलदार -गृहशाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्वतंत्र नोडल अधिकारी (समन्वय) आर.जी.दिवाण यांचा भम्रणध्वनी संपर्क ९८९०९२९५१० व दूरध्वनी ०२४१/२३४५४४९ असा आहे. उत्सव काळात सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारींच्या निराकरणासाठी यांच्याशी संपर्क साधू शकतात. असे आवाहनही श्री.निचित यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
Ahmednagar Collector Big Decision for Upcoming Festival Season