रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अहमदनगर शहरात लागले एवढे सीसीटीव्ही… दुसऱ्या टप्प्यात इतके लागणार…

by India Darpan
ऑगस्ट 15, 2023 | 7:04 pm
in राज्य
0
F3jRb 7W8AAl4st


अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतुन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अशा सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचा राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले की, अशा प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा शहरामध्ये कार्यान्वित करण्याची शहरवासियांची मागणी होती ती आज या निमित्ताने पुर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील 51 चौकांमध्ये 204 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखीन 200 कॅमेरे बसविण्यात येणार असुन जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे शहरांतर्गत व शहराबाहेर होणाऱ्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास मदत होऊन गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाला यामुळे आळा घालता येणार आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगार पळुन जातात. अशावेळी या कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारांच्या वाहनांचा क्रमांक तसेच त्यांचे चेहरे ओळखता येणे शक्य होणार आहे. या यंत्रणेबरोबरच उद्घोषणा यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली असुन नियंत्रण कक्षातुन नागरिकांना सुचना देणेही यामुळे शक्य होणार असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अहमदनगर पोलीस प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे आज उद्घाटन केले.

याप्रसंगी खा.डॉ सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, भाजपा शहर अध्यक्ष अभय आगरकर, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष… pic.twitter.com/CGgW7d2qrS

— Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar) (@RVikhePatil) August 15, 2023
Ahmednagar City CCTV Chowk First Second Phase Security
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे निधन… असे आहे त्यांचे महान कार्य…

Next Post

मुख्यमंत्री सहायता निधी आता एका क्लिकरवर… व्हॉटसॲप हेल्पलाईन आणि मोबाईल ॲप सुरू… असा घ्या लाभ…

Next Post
F3kzX50agAEq6n0 e1692106945512

मुख्यमंत्री सहायता निधी आता एका क्लिकरवर... व्हॉटसॲप हेल्पलाईन आणि मोबाईल ॲप सुरू... असा घ्या लाभ...

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011