अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील कर्जत येथील चांदे खुर्द गावचा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकला आहे. ओंकार ईश्वर आवटे (वय २५, ग्रामसेवक, वर्ग ३, चांदे खुर्द, ता. कर्जत, जि. अहमदनगर.
रा. शिक्षक कॉलनी, ता. श्रीगोंदा) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.
राज्य शासनाच्या गाय गोठा योजने अंतर्गत अनुदानासाठी एका शेतकऱ्याने पंचायत समिती कर्जत येथे प्रकरण सादर केले होते. ते प्रकरण मंजूर करून देण्यासाठी लाचखोर ग्रामसेवक आवटे याने ७००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर या शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. लाचखोर ग्रामसेवक आवटे याने गट विकास अधिकारी कर्जत अमोल जाधव यांचे कडून सदर प्रकरण मंजूर करून घेण्यासाठी शेतकऱ्याकडे ७००० रुपये लाचेची मागणी केली. प्रथम ५००० आणि काम झाल्यानंतर २००० रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले. तसे एसीबीला निष्पन्न झाले. त्यानुसार आज रोजी चांदे खुर्द येथे लाचेचा सापळा आयोजित करण्यात आला. लाचखोर आवटे याने पंचासमक्ष संबंधित शेतकऱ्याकडून ५००० रुपये लाच रक्कम स्वीकारली. त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मिरजगाव पोलीस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सापळा अधिकारी*:-
शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर मो नंबर-: ७७१९०४४३२२
पर्यवेक्षण अधिकारी
हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर मो. नंबर :- ८६९३०३१३३३.
सापळा पथक
पोलीस अंमलदार पोना रमेश चौधरी, बाबासाहेब कराड, रवी निमसे,महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के,चालक- दशरथ लाड,हारून शेख
मार्गदर्शक
शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, पोलीस अधीक्षक, मो. नंबर- ९३७१९५७३९१, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, मो. नंबर- ९८२३२९११४८ ,ला.प्र.वि नाशिक.
नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, मो. नंबर ९८२२६२७२८८,ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
*@ टोल फ्रि क्रं. १०६४*
Ahmednagar ACB Trap Bribe Corruption Gramsevak