गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; नाशिक पोलिसांनी जबरदस्त शक्कल लढवत असे शोधले आरोपी

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2022 | 9:32 pm
in क्राईम डायरी
0
apharan 1

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खंडणीसाठी अहमदाबाद येथील व्यापाऱ्याचे अपहरण करणा-यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले आहे. विशेष म्हणजे खंडणीखोर भामट्यांना फोन पे व्दारे खंडणी नातेवाईकामार्फत पाठवत पोलिसांनी लोकेशन मिळवत सापळयात अडकवले. भंगाराचा माल कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून मुरली रघुराज भंडारी या २४ वर्षीय व्यापा-याचे अहमदाबाद ते धुळे प्रवासादरम्यान अपहरण झाले होते. त्याची पोलिसांनी सुखरुप सुटका केली.

या अपहरणाची माहिती भाऊ नीलेश भंडारी (मदुराई, तामिळनाडू) यांनी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना १४ नोंव्हेबर रोजी फोनव्दारे दिली. यावेळी भंडारी यांनी अपहरण करणा-यांनी तीन लाख रूपये खंडणीची मागणी केल्याचे सांगितले. हे पैसे फोन-पेवर पाठवा, पैसे न पाठवल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही अपहरणकर्त्यांनी दिल्याचेही सांगितले. ही सर्व माहिती मिळाल्यानंतर या अपहरण झालेल्या व्यापा-याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सुरु केला. या शोधात हा व्यापारी सटाणा परिसरात असल्याचे आढळले.

अशी केली सुटका
लोकेशन मिळाल्यानंतर अपहरण झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या सांगण्यावरून पोलीस गुन्हेगारांपर्यंत पोहचेपर्यंत थोडी-थोडी रक्कम फोन-पेव्दारे खंडणीखोरांना ट्रान्सफर केली. त्या दरम्यान पोलीस पथकांनी तांत्रिक विश्लेषणाव्दारे तपास सुरु ठेवला. तेव्हा पोलिसाना अपहरण झालेली व्यक्ती व खंडणीखोर हे सटाणा परिसरात असल्याचे स्थान निश्चित केले. त्यानुसार तपास सुरु ठेवून लोकेशनवर पोहचून संशयितांना ताब्यात घेत अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका पोलिसांनी केली.

हे आरोपी अटकले जाळ्यात
या कारवाईत दादाराम अख्तर भोसले, बबलु उर्फ बट्टा छोटू चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे साथीदार श्यामलाल भारलाल पवार, लुकडया फिंग्या चव्हाण, मुन्ना कलेसिंग भोसले, रामदास उर्फ रिझवान भारलाल पवार हे पोलीसांची चाहूल लागताच डोंगराळ भाग व जंगलाचा फायदा घेवून पळून गेले. दरम्यान, या प्रकरणाबाबत मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एस. डी. कोळी करत आहेत.

Nashik Rural Police Crime Kidnaping Trader Businessman

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार

Next Post

हा आहे गिधाडांवर प्रेम करणारा अवलिया… त्याने सुरू केलंय चक्क गिधाडांसाठी रेस्टॉरंट… जाणून घ्या त्याच्या या अफलातून कार्याबद्दल…

India Darpan

Next Post
images 87

हा आहे गिधाडांवर प्रेम करणारा अवलिया... त्याने सुरू केलंय चक्क गिधाडांसाठी रेस्टॉरंट... जाणून घ्या त्याच्या या अफलातून कार्याबद्दल...

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011