अहमदनगर – जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात कोरोनाचा कहर असल्याची बाब सोर येत आहे. यापूर्वीच या साळतील ५२ जणांना आणि २ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, आता या शाळेतील आणखी २८ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या विद्यालयातील बाधितांची एकूण संख्या आता ८२ झाली आहे. शाळेचा परिसर सील करण्यात आला आहे. निगेटिव्ह अहवाल आलेल्या विद्यार्थ्यांचे वसतीगृहातच विलगीकरण करण्यात आले आहे. तर, बाधित विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबीची गंभीर दखल घेतली आहे. परिसराची त्यांनी पाहणी करुन विविध निर्देश दिले आहेत.
https://twitter.com/ANI/status/1475465710633558019?s=20