अहमदनगर – जिल्ह्यातील एका शाळेतील १९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या विद्यार्थ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. हे सर्व विद्यार्थी टाकळी ढोकेश्वर येतील जवाहर नवोदय विद्यालयाचे आहेत. याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. शाळा आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, जिल्ह्यात आता कठोर निर्णय लागू करण्यात आले आहेत. लस नाही तर प्रवेश नाही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले असतील त्यांनाच विविध ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1474438894057766912?s=20