मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याच्या निर्यातीवर केंद्रातील मोदी सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. त्यामुळे बाजार समितीतील कांद्याचे दर गडगडणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. अशातच आता केंद्र सरकारने नवी घोषणा केली आहे. त्यानुसार अहमदनगर आणि नाशिक येथून २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना खरोखरच दिलासा मिळणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
डॉ. नवले म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडे 40 लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक असताना त्या संपूर्ण कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावायचा व दुसरीकडे आम्ही शेतकऱ्यांसाठी फार काही करतोय असे दाखवीत केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा करायची, हे या समस्येवरील उपाय नाही. केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याने समस्या सुटणार नाही. केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात कर रद्द करावा व त्यानंतर सरकारी कांदा खरेदी सारखे उपाय करावेत, अशी मागणी डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
बघा, त्यांच्या प्रतिक्रीयेचा हा व्हिडिओ
Agriculture Onion Purchasing Farmers Issue Expert Opinion
Dr Ajit Navale