इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अग्निपथ योजनेअंतर्गत, तीन सेवांमध्ये अग्निवीर भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. या संदर्भात अग्निवीरांची भरती कधी सुरू होणार आणि पहिली तुकडी या वर्षी प्रशिक्षणासाठी कधी जाणार, याबाबत आज तिन्ही दलांनी आपली योजना प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. अग्निपथ योजनेला देशव्यापी विरोध पाहता संरक्षण मंत्रालयाने रविवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत तिन्ही सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही योजनेसंदर्भात उपस्थित सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
हवाई दलातील भरती
एअर मार्शल एसके झा यांनी माहिती दिली की पहिल्या तुकडीच्या अग्निवीर भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 24 जून 2022 पासून सुरू होणार आहे. या बॅचसाठी पहिला टप्पा ऑनलाइन परीक्षा २४ जुलैपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर पहिल्या बॅचच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी डिसेंबरमध्ये सुरू होणार असून ही प्रक्रिया 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
नौदलातील भरती
व्हाईस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले की, पहिले नौदल अग्निवीर 21 नोव्हेंबर 2022 पासून ओडिशातील INS चिल्का येथे प्रशिक्षणासाठी पोहोचण्यास सुरुवात करेल. नौदलात महिला आणि पुरुष अशा दोन्ही अग्निवीरांची भरती केली जाईल. ते म्हणाले की, नौदलाकडे आधीच विविध जहाजांमध्ये 30 महिला अधिकारी तैनात आहेत. अशा परिस्थितीत नौदलानेही अग्निपथ योजनेंतर्गत महिला अग्निवीरांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाची भरती
लष्करात अग्निवीरांच्या भरतीच्या योजनेचे वर्णन करताना लेफ्टनंट जनरल बन्सी पोनप्पा म्हणाले की, यावर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 25,000 अग्निवीरांची पहिली तुकडी सैन्यात भरती केली जाईल. त्यानंतर फेब्रुवारी 2023 पर्यंत दुसऱ्या बॅचमधील उमेदवारांची भरती करून ही संख्या 40000 पूर्ण केली जाईल.
#Agniveer@byadavbjp @AshwiniKChoubey @PIB_India @PMOIndia pic.twitter.com/tJpEnBJD2X
— MoEF&CC (@moefcc) June 19, 2022
यावेळी अग्निपथ योजनेबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर संरक्षण व्यवहार विभागाचे सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी लष्कराची बाजू मांडली. ते म्हणाले की, अग्निवीरांचे ४ वर्षांनंतर काय होईल, असे लोक विचारत आहेत, मात्र दरवर्षी १७६०० जवान सेवा पूर्ण होण्यापूर्वीच सैन्यातून निवृत्त होत आहेत, त्यांना कोणीही विचारत नाही की आता काय करणार?
सध्या योजनेच्या सुरुवातीला ४६ हजार अग्निवीरांची भरती करण्यात येत असून, ही क्षमता आणखी वाढेल. पुढील 4-5 वर्षांत ही संख्या 50,000-60,000 होईल आणि नंतर ती 90 हजारांवरून एक लाखापर्यंत वाढवली जाईल. लष्कराच्या योजनेअंतर्गत 1.25 लाख अग्निवीरांची भरती केली जाईल. अशा प्रकारे 25% कायमस्वरूपी ठेवल्यास आपोआप 46,000 अग्निवीर कायमस्वरूपी दाखल होतील.
agneepath scheme recruitment mega plan applications defence security army navy iaf procedure