नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये ३ मे रोजी रात्री बाराच्या सुमारास बाचाबाची झाल्याने वातावरण चांगलेच तापले. दिल्लीमध्ये बुधवारी जोरदार पाऊस झाला. या पावसानंतर जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्यांची गैरसोय झाली. यातूनच मार्ग काढण्याच्या प्रयत्नांत पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात आले.
खेळाडूंचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजप खासदार बृजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यासाठी कुस्तीपटूंचे जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी रात्री पाऊस आल्यामुळे जंतरमंतरवर पाणी साचले. अश्यात कुस्तीपटूंची झोपण्याची अडचण झाली. त्यामुळे त्यांनी पलंग मागवले होते. पण पलंग आणायला पोलिसांनी रोखल्यामुळे कुस्तीपटूंचा संताप झाला. त्यानंतर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये वादावादी आणि हाणामारी झाली. या घटनेचे व्हिडियो लोकांनी व्हायरल केले आहेत.
https://twitter.com/AHindinews/status/1653998957524144128?s=20
आमच्या विशेष म्हणजे बजरंग पुनिया आणि पोलीस यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडियो देखील समोर आला आहे. यासोबत कुस्तीपटू विनेश फोगट हिला पत्रकारांशी बोलताना अश्रु अनावर झाले. तिने यासंदर्भात पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. दिल्ली पोलिसांनी याला किरकोळ वाद म्हटले आहे. आप नेते सोमनाथ भारती यांनी परवानगीशिवाय फोल्डिंग बेड आंदोलनस्थळी आणले. आम्ही मध्यस्थी केली तर कुस्तीपटू आक्रमक झाले. आम्ही सोमनाथ भारती यांच्यासह दोघांना ताब्यात घेतलं आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, विनेश फोगटने कुस्तीपटूंवर जीवघेणा हल्ला झाल्याची तक्रार करणारे पत्र दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहीले आहे. कुस्तीपटूंना जंतरमंतर सोडण्यासाठी धमकावल्याचेही तिने म्हटले आहे. त्यामुळे आता आंदोलन चांगलेच चिघळणार असल्याची चिन्हे आहेत.
https://twitter.com/priyankagandhi/status/1653970935387652104?s=20
कुस्तीपटूंवर हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी आणि जंतरमंतरवर वॉटरप्रूफ तंबू लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात विविध मागण्या करणारे पत्र पुनियाने केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवले आहे.
https://twitter.com/RahulGandhi/status/1654002242255552513?s=20
https://twitter.com/SwatiJaiHind/status/1653992644966768641?s=20
Agitation Wrestler Delhi Police Ruckus Video Viral